आंबेडकरवाद्यांनो एकीची ताकद समजून घ्या आंबेडकरवाद्यांनो एकीची ताकद समजून घ्या - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, December 4, 2019

आंबेडकरवाद्यांनो एकीची ताकद समजून घ्या

<img src="prakash-ambedkar.jpeg"=vanchit bahujan aghadi-prakash ambedkar">

आंबेडकरी समुहाची राजकीय पातळीवर ऐकी झाली आणि १९९५ साली अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या

नेतृत्वाखाली भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत साडे अकरा लाख मतें 

मिळविली, कॉंग्रेस पक्ष सत्तेबाहेर फेकल्या गेला आणि भाजप सेना युतीचे महाराष्ट्रात सरकार आरुढ झाले, 

म्हणून राजकीय क्षेत्रात भारिप बहुजन महासंघाचा दबदबा निर्माण झाला होता...! 

अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण झाल्यामुळे १९८९ साली व्ही. पी .सिंग यांच्या 

जनमोर्चा सोबत़ं भारिप बहुजन महासंघाची युती झाली आणि त्या युतीच्या बोलणीत बाळासाहेब आंबेडकर यांनी 

व्ही.पी. सिंगा सोबतं सहा अटिवर युती केली होती...!

त्या सहा अटिनुसार, बौद्धांना केंद्रात सवलती, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न, बाबासाहेब आंबेडकरांचे 

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तैलचित्र,मंडल आयोग लागू करणे,एस.सी.एस.टी अन्याय अत्याचाराचे परिमार्जन 

करणारा आयोग अशा अटी होत्या आणि जवळ जवळ त्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत...!

<img src="prakash-ambedkar.jpeg"=vanchit bahujan aghadi-prakash ambedkar">


आता २०१९ च्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीची ताकद पाहून शरद 

पवारांनी धसका घेतला आहे , आणि डायरेक्ट बौद्ध मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळवा असा संदेश पक्ष 

पातळीवर दिला आहे...! 

तुमची ऐकी फोडण्याचा हा प्रयत्न आहे...!

तुमची ऐकी झाली म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चे पोपट कसे बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर 

बोंबलून राहिले ते तुम्ही पाहत आहातच...!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर नतमस्तक होणारे मुख्यमंत्री तुम्ही बघतचं आहात...!

भिमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात हालचाल सुरू झाली आहे...!

समाजाची ऐकी नसेल तर काय होते,त्याचेही सिंहावलोकन करा...,!

दादासाहेब गायकवाड यांनी रिपब्लिकन पक्षाची कॉंग्रेस पक्षाच्या सोबतं युती केली आणि पुढे पुढे मग रा.सु. 

गवई यांनी एकही सिट न लढता केवळ कॉंग्रेस पक्षाला मतें देतं रहा असेच धोरण राबविले आणि रिपब्लिकन पक्ष 

राजकीय पातळीवर बेदखल झाला. त्याचा परिणाम असा झाला की,...! 

१९७६-७८ मध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतर चा मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी नामांतराचा खेळ मांडला 

तो खेळ सतत सतरा वर्षे चालू होता,आणि मराठवाड्यातील बौद्ध कार्यकर्त्यांना टार्गेट करुन हेरुन हेरुन मारले 

मात्र त्यांच्या वरील पोलिस केसेस कधीच मागे घेतल्या गेल्या नाही...!

समाजाची ऐकी नसल्यामुळे विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासही तयार नव्हते, वरुन समाजावर 

प्रशासनाला हाताशी धरुन प्रचंड अन्याय आणि अत्याचार केला गेला...!

रमाबाई आंबेडकर नगरात झालेल्या गोळीबाराचे आदेश कुणी दिले.?

शहिद झालेल्या ११ बौद्ध कार्यकर्त्यांना न्याय मिळाला का.?

गोळीबाराचे आदेश देणारा मनोहर कदम याला नोकरीत बढती कोणत्या पक्षाच्या सरकारने दिली.?

खैरलांजी हत्याकांडाचे वेळी, आणि रमाबाई आंबेडकर नगर च्या वेळी ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी 

गुन्हे दाखल केले ते का मागे घेतले नाही...?

समाजाची ऐकी नसल्यामुळे अन्याय अत्याचार वाढले, तुम्हाला कुणीही न्याय द्यायलाही तयार नव्हते. हे वास्तव 

आहे...!

समाजाची ऐकी झाल्यामुळे व्ही.पी.सिंगाच्या सरकार मार्फत सत्तेच्या खुर्चीत न बसताही चाळीस वर्षांपासून 

भिजतं पडलेले प्रश्न चुटकीसरशी सोडवता आले...! 

यापुढेही समाज एकत्र राहिला आणि आपली राजकीय ताकद दाखविली तर तुमचे प्रश्न सुटतील आणि समाज 

विखुरलेला राहिला तर सेक्युलॅरिझम चे ढोंग रचणारे असो वा आणखी इतरही कुणी असो, तुम्हाला कुणीही 

जोखणार नाही हा आजवरचा अनुभव आहे...!

ऊद्या जर भिमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेतल्या गेले तर समजा की,ती तुमच्या ऐकीची ताकद आहे...!

कुणीही मंत्री वा मुख्यमंत्री तुमचे गुन्हे मागे घेणार नाही तर तुमची वाढलेली राजकीय ताकद प्रस्थापितांची सत्ता 

हिसकावून घेऊ शकते ही भिती तुम्हाला न्याय देतोय असे म्हणायला भाग पाडते...!

तुमच्या राजकीय पातळीवरील ऐकी मुळे प्रस्थापित पक्षांची सत्ता धोक्यात येते ही भिती काही तरी करायला भाग 

पाडते हा सिद्धांत लक्षात ठेवा...!

आंबेडकरवादी समाज एकत्र राहिला तर छोट्या छोट्या ओबीसी समुहाला सुद्धा न्याय देऊ शकतो, म्हणून 

राजकीय पातळीवरील आमची ऐकी हीच आमची खरी राजकीय ताकद आहे...!

आमच्यावर कुणीही मेहेरबान होतं नाही, आम्हाला कुणीही संधी देतं नाही,आम्हाला कुणीही सहानुभूती दाखवितं 

नाही, आम्हाला कुणीही बरोबरीने सत्तेचा,वाटा देतं नाही हा गेल्या सत्तर वर्षांपासून चा अनुभव आहे...!

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे "पासंगाचे" राजकारण म्हटले होते,ते हेच आहे...!

तुमच्या पासंगा शिवाय प्रस्थापितांना सत्ता मिळतं नाही हे सिद्ध करीत रहा...!

आपला एकच नेता,एकच झेंडा,एकच पक्ष...!

समाजाची ऐकी म्हणजेच प्रश्न सुटण्याची हमी. हा सिद्धांत लक्षात घेऊन पुढिल वाटचाल करु...!

जयभीम.

लेखक : भास्कर भोजने ( वंचित बहुजन आघाडी समर्थक )