एकदा बाबासाहेब आणि रमाई दादर च्या राजगृह बंगल्यावर राहत होते.त्यावेळी एकदा अचानक बासाहेबांना
परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाई ला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब
धारवाड च्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाई ला पाठवतात व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले. ते वराळे
काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वस्ती गृह चालवत असत.त्या वस्ती गृहाच्या आवारात अनेक लहान मुले
खेळायला येत असत.एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे
काका यांना विचारते दोन दिवस झाली हि मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी
वैराळे म्हणतात कि हि लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत तर हि खेळायला कशी येतील. रमाई त्यांना
विचारते हि मुले का उपाशी आहेत तर ते रमाईला बोलतात कि वसतिगृहाला जे अन्न धान्याच महिन्याला भेटत
असायचं ते अजून मिळालेलं नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील.अजून तीन दिवस हि मुले उपाशी च
राहणार आहेत. वराळे अगदी कंठ दाटून ते बोलतात.
त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जाते आणि रडत बसते आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि
आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देते आणि म्हणते तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा
ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या.मी अजून तीन दिवस
हि लहान मुले उपाशी नाही पाहू शकत.त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान
मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खुप आनंदी
राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले
रमाबाई यांना रमाआई म्हणून बोलायला लागतात.आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली.आणि ती
आपल्या सगळ्यांची आई झाली.
म्हणून ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" बोलतात कि...
भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
भुकेल्या मुलांची दशा पाहुनी,
बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी.
धन्य रमाई | धन्य रमाई |
अश्या आपल्या बहुजनाच्या मातेस माझे कोटी कोटी प्रणाम !