शिवाजीपार्कवरील ७० टन कचऱ्याच षडयंत्र... शिवाजीपार्कवरील ७० टन कचऱ्याच षडयंत्र... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, December 13, 2017

शिवाजीपार्कवरील ७० टन कचऱ्याच षडयंत्र...

६ डिसेंबर , बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभुमी,शिवाजीपार्क

दादर परिसरात येत असतात. यावर्षी पावसाच्या संकटामुळे महाराष्ट्र सरकार, बीएमसी (महानगरपालिका) ,

पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या उदासीन कारभाराचा चेहरा सर्वांच्या समोर आला हे

आपल्याला ठाऊकच आहे. ह्या प्रशासनाच्या विरोधात एकवटत चालेला भीमयुवकांचा आवाज चांगलाच

झोंबलाय विरोधकांना, जातीयवाद्यांना.


  <img src="dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din.jpeg"=dr.babasaheb ambedkar mahaparinirvan-din-70-ton-garbage-at-chaityabhumi-viral-sach">


कालपासून काही मीडिया आपल्या वृत्तपत्र, ऑनलाइन न्यूज पोर्टल, फेसबुक पेज यांच्या माध्यमातून चैत्यभूमीवर

७० टन कचरा, भीम अनुयायांच्या व्यवस्थेसाठीच्या शाळांमधे दारूच्या बाटल्या सापड़ने वगैरे वगैरे.

अशाप्रकारच्या नीगेटिव्ह बातम्याचा प्रसार करते आहे. याची कारणमीमांसा झालीच पाहिजे तसेच बिनबुडाच्या

असल्या जातीय मानसिकतेच्या बातम्या प्रसिद्द करणाऱ्या वृत्तपत्रांना जबाब विचारुन माफ़ी मागण्यास भाग

पाडले पाहिजेच.

६ डिसेंबर रोजी चैत्यभुमीवरील गर्दीचा विचार करता होणाऱ्या सामान्य कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी

सोशल मीडियाच्या माध्यमातून "आम्ही आंबेडकरवादी" संघटनेच्या पुढाकाराने महीनाभरापासून एक चळवळ

चालवली गेली ती म्हणजे "आपली भूमी! चैत्यभूमी!! स्वच्छ भूमी!!!" यामधे सोशल मीडियाच्या माध्यमातून

युवकांना चैत्यभूमीवर होणाऱ्या कचरा व्यवस्थापनात मदतीचा हात देण्याचे अवाहन करण्यात आले होते.

 <img src="dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din.jpeg"=dr.babasaheb ambedkar mahaparinirvan-din-70-ton-garbage-at-chaityabhumi-viral-sach">

आंबेडकरी समाजात मुळातच नियोजन गुण भरलेला दिसून येतो. त्याप्रमाणेच ह्या उपक्रमात जवळपास १०००

तरुण तरुणी सहभागी झाले होते. तुम्ही एखाद्या मॉल-हॉस्पिटल मधे जाल आणि तिथे तुम्हाला कचरा

व्यवस्थापनाच जे रूप दिसेल अगदी तसच काम ह्या हजार युवकांच्या टीम ने केलं. हातात ग्लोव्हज , डोक्याला

टोपी, अंगात पांढरा टी-शर्ट , तोंडाला स्कार्फ , पायात बूट आणि सोबत कचरा जमा करण्यासाठी ब्लॅक गार्बेज

बॅग. अगदी कॉर्पोरेट लुक आणि कॉर्पोरेट पद्धतीची वागणूक असणारा प्रत्येक टीम मेंबर. चैत्यभूमी-शिवाजीपार्क

च्या परिसरात कानाकोपऱ्यात ही मुले-मूली पसरलेली होती. तुम्ही खाली जमिनीवर कचरा टाकला की पुढच्या

मिनिटाला तो कचरा उचलल्या जाण्याची १००% खात्री होती. इतक्या मोठ्या प्रमाणात हे युवक न थकता काम

करत होते. कणभर सुद्धा कचरा दिसत नव्हता. एका मोठ्या कॉर्पोरेट इवेंट सारखं काम ह्या टीमने केलं आणि ते

ही फ़क्त समाजासाठी. कुठलीच प्रसिद्धी त्यांना नको होती. त्यांनी कुठल्याच् प्रसिद्धीसाठी काम केलं नाही.

चैत्यभूमी परिसरात त्या दिवशी कुठेच कचऱ्याचे ढिग साचु दिले नाही. ओला-सुखा कचरा सगळाचा सगळा ही

पोरं क्षणार्धात आपल्या थैलित भरून घेऊन जात होती आणि लोकांना पण जागृत करत होती की कचरा करू

नये. कितीही कौतुक करावं तेवढं कमी आहे या टीमचं. एवढं सगळं मी बघत असताना मला महानगरपालिकेचा

सफाई कर्मचारी मात्र कुठेही दिसला नाही. ना की कचरा फेकन्यासाठी महानगरपालिकेच्या कचरापेट्याही.

एकंदरित सांगायच तात्पर्य की, चैत्यभूमीवर एवढी स्वछता व्यवस्थापन करून देखील ७० टन कचरा आला

कुठून आणि तो ही ६ डिसेंबरच्या तब्बल दोन दिवसानंतर??

महाराष्ट्र सरकार , महानगरपालिका यांचा सावळा गोंधळ , जातीयवादी वागणूक यांचा चेहरा आंबेडकरी

युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन जगाच्या समोर आणला. तसेच जातीय मांनसिकतेच्या मिडियाचीही

खबरदारी घेतली. ही सगळी छी-थू होत असल्यामुळे नेहमीप्रमाणे धनाढ्य-बलाढ्य सत्ताधारी लोकांनी ,

प्रशासनाने आपल्या बांडगुळ , जातीय विचारांनी नालायक मुर्खपना करत बिकाऊ, पैशाच्या लालची मीडियाला

धरून आंबेडकरी समाजाच्या बदनामीचा कट रचला. हे आपन नेहमीच बघत आलोय की, आंबेडकरी

समाजाला बदनाम करण्यासाठी ह्या जातीयवादी लोकांच्या नांग्या पुढेच असतात.

या घडलेल्या घटनेतुन एक बघायला मिळतं की, कुठल्याही राजकीय नेत्यांच्यावीना एकत्र येऊन आख्खा सरकार

, प्रशासन , मीडिया आंबेडकरवादी युवकांनी दनाणुन सोडला. सोशल मीडिया तसेच ग्राउंड लेव्हलवरही

जबरदस्त काम करत या युवकांनी चळवळ हातात घेतल्याच दिसून येतं आहे. खरं बघायच झालं तर आंबेडकरी

युवकांनी सरकार , बीएमसी यांना ६ डिसेंबरच्या ढीसाळ व्यवस्थेवरुन जे धारेवर धरलं तसेच संपूर्ण जगासमोर

सत्यता मांडली. भिकार कारभाराची वाच्यता फोडली त्याच कारणाने घाबरुण गेलेल्या, प्रतिमा मलिन झालेल्या

प्रशासनाला आणि मीडियालाही आंबेडकरी समाजाची निंदा करायला भाग पाडल्या गेलं. हे लोकं पहिल्यापासून

जातिवादी आहेतच आणि त्यांच्या विचारसरणी नुसार छिनाल वृत्तीसारखी कामें त्यांनी केली आणि नालायक,

बिनबुडाच्या खोट्या बातम्याचं षडयंत्र रचत त्या प्रसिद्द करायला सुरुवात केली.


 <img src="dr-babasaheb-ambedkar-mahaparinirvan-din.jpeg"=dr.babasaheb ambedkar mahaparinirvan-din-70-ton-garbage-at-chaityabhumi-viral-sach">


आंबेडकरी युवक हां विचारांचा राजा होत चालला आहे. प्रशासन आणि मीडियाच्या या खेळीला उत्तर देत आता

आक्रमक झालेला भीमसैनिक नक्कीच या मिडियाला शरण यायला लावेल. पण त्यासाठी सर्वांची साथ लागेल.

संविधानिक पद्धतीने आपण सर्वजन मिळून या प्रशासन आणि मिडियाला कायद्याचा मारा देऊ आणि त्यांच्या

जातीय मानंसिकतेला पिटाळुन लाऊ. शरमेने मान खाली जाईल अशी त्यांची हालत करू ठेऊ. हे सर्व करत

असताना आपल्याला यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल की आपल्याला असल्या घटनेत व्यस्त ठेऊन कुठला

दुसरा मारा तर आपल्यावर केला जात नाहिये ना. सर्व बाजूंनी आपण चोख राहायला पाहिजे. आपल्याला नेहमीच

एका गोष्टीत अडकवुन दुसऱ्या जातीयद्वेषभावना या संघी विचारांच्या शक्तींनी पूर्ण केल्यात. रोहित वेमुला आणि

कन्हैय्याकुमार प्रकरण तुम्ही उदाहरणार्थ घेऊ शकता.तर मित्रांनो सर्व बाजूंनी विचार करत योग्य भूमिका घेऊन

आपण लढुया. सर्व जातीय शक्तिन्ना त्यांची जाएगा दाखवून देऊया.

७० टन कचरा जमा केल्याची बातमी ही निंदनीय आणि निषेधार्थ आहे. आम्ही सर्व आंबेडकरी युवक आपल्या

परीने या लढ्यात सामिल होतोय. काही युवक महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता ह्या वृत्तपत्रांच्या ऑफिसात धड़क

देऊन आलेत. पण त्या संपादकांनी माफीनामा च्या नावाखाली फ़क्त खुलासा लिहून दिलाय. आपण त्यांना माफ़ी

मागितल्याशिवाय सोडणार नाहीच आहोत. महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता, मुंबई चौफेर यांच्या कार्यालयांवर

सांविधानिक पद्धतीने आंदोलन करत आपणही प्रत्येक शहरातून निषेध व्यक्त करू शकता. तसेच कायदेशीर

कार्रवाईची मागणीही करू शकता. फ़क्त कुठेही हिंसकरूप येता कामा नये ही आपली जबाबदारी आहे. आपण

लढुया आणि जिंकुयाही!!

महाराष्ट्र टाइम्स , लोकसत्ता , मुंबई चौफेर या सगळ्या वृत्तपत्रांचा जाहिर निषेध! निषेध!! निषेध!!!

- शेखर निकम. ( FB वॉलवरुन साभार)