जेव्हा जेव्हा समाज आंबेडकर परिवाराकडे पर्याय म्हणून आकर्षित होऊन केंद्रीत व्हायला लागतो किंवा
प्रकाश आंबेडकर यांचे स्वाभिमानी नेतृत्व मान्य करून भारिप बहूजन महसंघाकडे वळायला लागतो, तेव्हा
तेव्हा रिपब्लिकन ऐक्याच्या, रिपब्लिकन पुर्नबांधणीच्या वावटळी उठविल्या जातात.
लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा रिपब्लिकन पक्ष, त्यांची संकल्पना अशा भावनिक आव्हानाचे भारूड
उभे केले जाते. या सर्व वावटळी आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांकडून अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध
पद्धतीने समाजाला पुन्हा विभक्त करण्यासाठी केल्या जातात. त्यासाठी "समाजात कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे
उगविणाऱ्या बुजगावण्यांना हाताशी घेतले जाते व नियोजनबद्ध रित्या समाजात मतभेद फोफावल्या जातो."
हल्ली अशाच प्रकारच्या वावटळी रिपब्लिकन पुर्नबांधणी व एकीकरणाच्या नावाने उठविल्या जात आहेत.
त्यासाठी अगदी हातातले बाहूले उभे केले गेले आहेत. सुनिल खोब्रागडे, हर्षवर्धन ढोके, राजरत्न सपकाळ
(आंबेडकर), सरोदे सारखी माणसे उभी केली जातात. त्यांना तरूण हा निकष लावला जातो. व जणुकाही
आंबेडकरी चळवळ या पावसाळी छत्र्यांच्या रूपाने उगविलेल्या तरूणांच्या हातात स्थिरावणार आहे व रातोरात
शतकाची आंबेडकरी चळवळ यांच्या माध्यमातून यशस्वी होणार आहे; अशाप्रकारचा अनाकलनिय आशावाद,
युक्तीवाद मांडला जातो. या सर्व म्होरक्यांच्या डिएनए ला रसद पुरविणारी माणसे शोधली तर असे कळते की,
आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आंबेडकरी चळवळीला योगदान तर दिले नाहीच पण ज्यांनी आंबेडकरी चळवळीच्या
नावाने समाजाला व चळवळीला आंबेडकर विरोधकांच्या दावणीला बांधले तेच सर्व या कुत्र्यांच्या पावसाळी
छत्र्यांप्रमाणे उगविणाऱ्या बुजगावण्यांना रसद पुरविणारे आहेत. किती हा नालायकपणा, करंटेपणा ?
मी म्हटले आहे त्याप्रमाणे "एका आंबेडकराने इतिहास घडविला, तर दुसरा आंबेडकर (प्रकाश आंबेडकर )
भविष्य घडवेल" यासाठी आंबेडकर नावाच्या नेतृत्वाखाली काहीही झाले तरी या समाजाला एकत्रीत होऊ द्यायचे
नाही असा पिंड उचललेल्या विरोधकांकडून रिपब्लिकन ऐक्याचा, रिपब्लिकन पुर्नबांधणीच्या नावाने
समाजातीलच बुजगावण्यांना हाताशी धरून नियोजनबद्ध आंबेडकरी चळवळीत संभ्रम तयार केला जातो.
तसेही समाजाचे, चळवळीचे नेतृत्व आंबेडकर नावाने करू नये यासाठी समाजातीलच अनेक गुडघ्याला
तसेही समाजाचे, चळवळीचे नेतृत्व आंबेडकर नावाने करू नये यासाठी समाजातीलच अनेक गुडघ्याला
बाशिंगधारी विरोधक आहेत. तेच या रिपब्लिकन ऐक्याच्या, एकीकरणाच्या, पुर्नबांधणीच्या नावाने समाजात
आंबेडकर नेतृत्वाविषयी द्वेष पसरविण्याचे काम करतात. हा आजपर्यंतचा इतिहास राहीलेला आहे. त्याच
इतिहासाची री हे वरील बुजगावणे ओढीत आहेत. पण आजपर्यंत एकीकरणात, पुर्नबांधणीत खऱ्या स्वाभिमानी
आंबेडकर नावाला व नेतृत्वाला केंद्रीभूत करून समाजाला एक पक्ष, एक नेतृत्वात संघटीत करण्याच्या प्रयत्नात
कुणीच कसा काय दिसला नाही. हे या चळवळीचेच नाही तर या समाजाचे दुर्भाग्य आहे.
ज्यांना आंबेडकर चळवळ माहीत नाही, रिपब्लिकन संकल्पना माहीत नाही, चळवळीचा इतिहास माहीत नाही,
ज्यांना आंबेडकर चळवळ माहीत नाही, रिपब्लिकन संकल्पना माहीत नाही, चळवळीचा इतिहास माहीत नाही,
चळवळ चालविणाऱ्या जून्या पिढीविषयी कृतघ्न आहेत अशी माणसे पुर्नबांधणीच्या गप्पा हाकत असतील तर एक
दिवस समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भावनिक करून आर्थिक शोषण करून, नेतेगिरीची
भूक भागवून समाजाला कृतघ्न होतील हे लक्षात घ्या.
रिपब्लिकन ऐक्याचे, पुर्नबांधणीचे नाव घ्या व नेतेगिरीचे गुडघ्याला बाशिंग बांधा !
रिपब्लिकन ऐक्याच्या, पुर्नबांधणीच्या नावाखाली जे जे समोर आले त्यांनी त्यांनी रिपब्लिकनचा नवा गट बनवून
नेतेगिरीची हौस भागवून घेतली. समाजाला आर्थिकरित्या ओरबाडले. व स्वतःचे इमले बनवून याच मागास
समाजात अभिजन म्हणून मिरवू लागले. यांच्यातल्या नेतेगिरीची हौस बघून, समाज विघटीत होऊन संभ्रमित
होतांना पाहून आंबेडकर चळवळीच्या विरोधकांनी यांना पैसा दिला, पदं दिली, प्रसिद्धी दिली. आजही तेच होत
आहे. रिपब्लिकन ऐक्याचे, पुर्नबांधणीचे गुडघ्याला बाशिंग बांधून आज समाजात फिरत असलेले पुढारी
नेतेगिरीची कुवत नसतांना दंड थोपटतांना दिसुन येत आहेत. यावरूनच लक्षात येते की यांचे मनसुभे समाजाच्या,
चळवळीच्या हिताचे नसून स्वतःचे आर्थिक व राजकीय हित जोपासण्यासाठी आहे. या पावसाळी कुत्र्यांच्या
छत्र्यांप्रमाणे उगविणाऱ्या गुडघ्याला बाशिंग बाधलेल्या बुजगावण्यांपासून समाजाने सावध रहावे.
समाजाकडून आर्थिक रसद मिळायला लागली की हे बूजगावणे अधिकच अविचारी कल्लोळ करायला लागतात.
समाजाकडून आर्थिक रसद मिळायला लागली की हे बूजगावणे अधिकच अविचारी कल्लोळ करायला लागतात.
त्यामुळे यांची पोटं भरण्यापेक्षा समाजाने स्वतःच्या पोटाचा विचार करावा.
शेवटी या सर्व बुजगावण्यांना माझा एकच प्रश्,"तुमच्या कर्तुत्वशून्य बापाच्या चुकांवर जरी बोटं ठेवले तर तुम्ही
शेवटी या सर्व बुजगावण्यांना माझा एकच प्रश्,"तुमच्या कर्तुत्वशून्य बापाच्या चुकांवर जरी बोटं ठेवले तर तुम्ही
त्यांना मारायच्या धमक्या देता. मग ज्यांच्या कर्तुत्ववान आज्याने व बापाने या समाजासाठी व चळवळीसाठी रक्त
आटवले तरी त्यांना बदनाम करणाऱ्या तुमच्यासारख्या बांडगुळांसोबत त्या नातवांनी व पोरांनी काय करावे ? व
काय करायला पाहीजे ?" एवढेच सांगा.
एक आव्हान :-
सर्व समाजाने आता चळवळीसमोर एकमेव पर्याय उरलेला आहे हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या
एक आव्हान :-
सर्व समाजाने आता चळवळीसमोर एकमेव पर्याय उरलेला आहे हे लक्षात घेऊन प्रकाश आंबेडकर यांच्या
नेतृत्वात संघटीत होऊन त्यांच्या पक्षात विलीन व्हावे. रिपब्लिकन पक्ष गतवैभव प्राप्त करेल. व अक्कलशून्य
पुर्नबांधणी वा ऐक्याची गरज पडणार नाही. व ऐक्याच्या, पुर्नबांधणीच्या नावाने उभे झालेल्या अक्कलशून्य
माणसांच्या दुकानदाऱ्या बंद पडतील.
टिप :- हे लिखाण भावनिक किंवा पक्षाचा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही तर इतिहास व वास्तवात ही चळवळ
टिप :- हे लिखाण भावनिक किंवा पक्षाचा राजकीय कार्यकर्ता म्हणून नाही तर इतिहास व वास्तवात ही चळवळ
ज्या चुकीच्या मार्गावरून मार्गक्रमण करीत आली त्यापासून नव्या पिढीला परावृत्त करून त्यांना भावनिक रित्या
फसविणाऱ्यांपासून सावध करण्यासाठी आहे.
विचार : अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर
विचार : अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर