चीन मध्ये सुरु होतंय नालंदा विश्वविद्यालय चीन मध्ये सुरु होतंय नालंदा विश्वविद्यालय - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, June 11, 2017

चीन मध्ये सुरु होतंय नालंदा विश्वविद्यालय

<img src="nalanda-in-china.jpg" alt="china builds nalanda in hainan"/>


नालंदा हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक होते. ते सध्याच्या बिहार राज्यात येते. याठिकाणीच नावाजलेले

नालंदा विश्वविद्यालय होते. ज्याठिकाणी जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येत होत .हे विद्यापीठ जगातील

एकमेव असं होत कि जिथं राहण्याचीही सोया होती .जवळजवळ १०,००० विद्यार्थी क्षमता असणार विद्यापीठ

काही नाकार्ते राज्यकर्त्यांमुळे आणि पसरलेल्या ब्राह्मणी जाळ्यामुळे ह्या विद्यापीठाला जाळून खाक करण्यात

आलं पण आजही त्याचे अवशेष आणि इतिहास आपल्याला वाचायला मिळत आहे


यासाठी २००६ मध्ये चीननं पुढाकार घेऊन हे नालंदा विश्वविद्यालय पुन्हा नव्याने चालू करण्यासाठी भारत

सरकारला ( मनमोहन सिंग - काँग्रेस सरकार ) एक प्रस्ताव ठेवला आणि आम्ही लागणारी मदतही करू अशी

गवाही हि दिली. त्यानुसार सरकारने २००७ मध्ये एक समिती नेमून त्यात अमर्त्य सेन सारखे दिग्गजाणवर

जिम्मेदारी सोपविली आणि हळू हळू का होईना पण २०१४ मध्ये 14 विद्यार्थ्यांसह 11 शिक्षकांनी सुरुवात केली.

पण तिकडे चीनने गुप्तता पाळत आपल्याच देशात म्हणजे चीन मध्येच नालंदा विश्वविद्यालय बनवून ते आता

येत्या ३१ सप्टेंबर २०१७ ला नियमित सुरु होणार आहे.सध्या २२० विद्यार्थ्यानि नोंदणी केली आहे आणि

३१ जुलै २०१७  नाव ऍडमिशनची तारीख आहे . जगभरातील विद्यार्थे येथे ऍडमिशन घेत आहेत .
 
या विश्वविद्यालयाला त्यांनी नाव दिलय " नानहाई बौद्ध अकादमी" ( Nanhai Buddhist Academy ) जी चीनच्या

हैनान प्रांतात ( Hainan Province of China ) निसानन पर्वत वर संन्याच्या नानशान मंदिर ( Sanya's Nanashan

Temple )येथे उघडली आहे. जवळ जवळ ६१८ एकर जमिनीवर हे विद्यापीठ पसरलं आहे आणि जवळच समुद्र

किनाराही आहे आणि विद्यापीठच्या किनारपट्टीला "ब्रह्म शुद्ध जमीन"( Brahma Pure Land ) असे नाव देण्यात

आले आहे. विद्यापीठ सहा विभागांमध्ये तीन भाषा- पाली, तिबेटीयन आणि चिनी भाषेतील अभ्यासक्रम देऊ

करेल.या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून बौद्ध धर्म गुरु यिन शुन ( Yin Shun ) असतील . मॉन्क यिन शून देखील

लुंबिनीस्थित झोंग हुआ चायनिज बौद्ध मंदिर महासभेचे सदस्य आहेत. तसेच हे विद्यापीठ पंचन लामा, चायनीज

अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस, थाई आणि श्रीलंकेन बौद्ध केंद्रे जवळची विद्यापीठेशी संलग्न आहेत.

इकडे भारत गाय मोर यांची व्यवस्था करत आहे आणि तिकडे चीनने पाऊले उचलीत भारता बौद्ध देशांच्या

यादीत मागे मागे टाकीत आहेत .

चीनने केलेल्या या कामगिरीबद्दल चिनी सरकारचे अभिनंदन !