मिनँडर उर्फ मिलींद (इ.स. पू.२०६ ते इ. स. पू. १३० ) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा पंजाब, मथुरा या प्रदेशावर
साधारणत: इ. स.पू.१६५ ते इ.स.पू.१३० पर्यंत राज्य करणाऱ्या ग्रीक राजांमध्ये सर्वात उल्लेखनिय राजा होता.
यालाच मिनँडर पहिला असेही संबोधले जाते. मिलींद हा बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेला पहिला परकीय ( ग्रीक )
सत्ताधीश होता. "मिलींदो पन्हो " ( मिलींद प्रश्न ) या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथामध्ये प्रसिद्ध बौद्ध भिक्षू भन्ते नागसेन
यांच्याशी झालेले प्रश्नोत्तरात्मक , जिज्ञासू संवाद आहेत.
मिलींद चा जन्म " युथीडीमस "च्या वंशामध्ये इ. स.पू.२०६ मध्ये आई " दिमित्री " व वडील "हेलियोकल" या
दांपत्याच्या पोटी " कलासी " म्हणजेच सध्याच्या " बघराम " या अफगाणिस्तानातील शहरी झाला.तो इ. स.
पू.१६५/१५५च्या दरम्यान राज्यपदावर रुढ झाला.मिलींदच्या पत्नीचे नांव "अभभोक्लेइया "असे होते व त्याला दोन
मुले होती . त्या दोघांचेही नांव " स्ट्रँटो-१ , व स्ट्रँटो -२. असे होते.मिलींदच्या राज्याचा विस्तार बँक्ट्रिया,
अफगाणिस्तान, पाकिस्तान व उत्तर भारतात पंजाब- मथुरेपर्यंत होता.दक्षिणेस यमुना नदीपासून उत्तरेस ऑक्सस
नदीपर्यंत त्याचे राज्य पसरलेहोते. " शाकल " (सियालकोट) ही त्याची राजधानी, तर "बल्ख " (बाल्हीक ) ही
त्याची उपराजधानी असून,ही दोन्हीही नगरे पाटलिपुत्र नगराप्रमाणेच भरभराटीस आली होती.या प्रदेशात भ्रमण
करणाऱ्या बौद्ध भिक्षू व श्रमणांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्या जिज्ञासू व चौकस वृत्तीमुळे अनेक विद्वानांचा
वादविवादात त्याने पराभव केला. त्यामुळे त्याला आपल्या ज्ञानाचा गर्व वाटू लागला. व तो ज्ञानी जनांना व
विद्वानांना वादविवादासाठी आव्हान देऊ लागला. प्रख्यात विद्वान बौद्ध भिक्षू भन्ते नागसेन यांनी त्याचे हे आव्हान
स्विकारून वादविवादात त्याचा जाहीर पराभव केला.आपला पराभव मान्य करून मिलींदने भन्ते नागसेन यांना
आपले गुरु मानून , त्यांच्याच हातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, व तो तो बौद्ध धम्माचा अनुयायी बनला.भन्ते
नागसेन यांच्याशी झालेला त्याच्या प्रश्नोत्तर रूपी संवादाचे सार म्हणजेच प्रख्यात पाली बौद्ध धम्म ग्रंथ " मिलींदो
पन्हो " अर्थात... " मिलींद प्रश्न " होय.....
ग्रीक इतिहासकार " प्लुटार्क " याने मिलींद बद्दल लिहून ठेवले आहे, की मिलींद हा मोठा न्यायी, विद्वान व
लोकप्रिय असा राजा होता. इतका, की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अस्थि-अवशेषांवर मोठे मोठे स्तूप बनवले गेले....
मिलींद ला शास्त्रचर्चा व वादविवादाची मोठी आवड होती.अनेक विद्वानांना त्याने वादविवादात पराभूत केले
होते."मिलींद प्रश्न " या पाली ग्रंथात त्याने बौद्ध धम्माचा स्विकार करण्यामागचे विवरण दिले आहे. मिलींदच्या
अनेक नाण्यांवर धर्मचक्र प्रवर्तनाचे प्रतिक चिन्ह " धर्मचक्र " कोरलेले असून , आपल्या नावासमोर " ध्रमिक "
अर्थात.." धार्मिक "हे विशेषण ( पदवी ) मोठ्या अभिमानाने तो लावत होता , हे दिसून येते....!!!
लेखक : धम्म मित्र : अशोक नगरे
मोडी लिपी तज्ज्ञ, धम्म लिपी ब्राह्मी व धम्मभाषा पाली अभ्यासक ,
बौद्ध लेणी, बौद्ध शिल्प व बौद्ध चित्रकला, बौद्ध
स्थापत्य व बौद्ध पुरातत्व अभ्यासक,
बौद्ध इतिहास संशोधक.रनेर, जि अहमदनगर.