आजचा बौद्ध हा जागरूक लढवय्या व संघर्षशील आहे. अन्याय कोणावरही होवो प्रत्येक बौद्धाला वाटतं की
अन्याय माझ्यावर झालेला आहे म्हणुन परिस्थितीशी झुंज देत तो व्यवस्था परिवर्तनासाठी लढत असतो.
सामाजिक न्याय, आर्थिक समता, विश्व बंधूत्वाच्या न्यायाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू असते.
बौद्ध समाज हाच सर्वात जीवंत असा समाज आहे. त्यामुळे प्रस्थापित जाती व्यवस्थेने नेहमीच बौद्ध युवकांना
आणि पुढच्या पिढीला टारगेट केले आहे. युद्ध नेहमी संघर्षशील योद्यां बरोबर होत असते. त्यामुळे बौद्ध समाज
नेहमीच टीकेचा धनी झालेला आहे.अनुसूचित जाती प्रवर्गातील ६० जाती व अनुसूचित जमातीं मधील ५९
जातींच्या आरक्षणासाठी मरणारा व संघर्ष करणारा समाज म्हणजे बौद्ध समाज ओबीसी, विजाभज विमाप्र या
सर्वांना आरक्षण यासाठी संघर्ष करणारा समाज म्हणजेच बौद्ध समाज बौद्ध समाजाने स्वतःसाठी असे काहीच
मिळविले नाही. पण अनुसूचित जातीतील ६० जाती, अनु. जमाती (आदिवासी) प्रवर्गातील ५९ जाती, ओबीसी
असलेल्या एकुण ४५० जाती यांच्यासाठी तो लढत राहिला पण राज्यातील ह्या ७००/ ८०० जातीतील एकाही जाती
प्रवर्गाने बौद्धांचे आभार मानले नाहीत.आज बहुतांश लोक शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षणाचे फायदे उपटत
आहेत. पण शासकीय नोकरी धारण करणार्या कोणत्याही समाजाने कधीच बौद्धांच्या रक्त संघर्षातून आम्हाला हे
आरक्षणाचे लाभ मिळाल्या प्रित्यर्थ बौद्धांचा कधीच सन्मान करू वाटला नाही.
बौद्ध समाज हा संघर्षशील आणि संयमी आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या संघर्षाबद्दल कुणी पारितोषक व
प्रमाणपत्र द्यावे असे कधीच कुणाला वाटले नाही व तसे विचार कधीच मनांत येत नाहीत.त्यामुळेच महाराष्ट्रावर
अनियंत्रित नियंत्रण व निरंकुश सत्ता मिळविण्याच्या इर्षेत असणार्या माजोरी आणि धनदांडग्या लोकांनी बौद्ध
समाजाला टारर्गेट केले आहे. उद्या या ७००/८०० जातीतील एखाद्या जातीने संघर्ष करून हक्क मिळविण्याचा
साधा प्रयत्न जरी केला तरी त्यांना कसे टार्गेट केले जाते याचा अनुभव येईल. पण नाही इतराना फक्त आणि फक्त
काठावर बसुन मासे पळवन्यात आनंद आहे त्याना लाभही पाहिजे आणि मनुवाद्यांच्या माडीं लावुन बसायलाही
पाहिजे