डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव असे नेते आहेत कि ज्यांनी आपल्या मागे आपल्या परिवारासाठी
काहीही राखलं नाही .त्यांच्याकडे जे काही होत ते त्यांनी सरकारला आणि जनतेला बहाल केलं आहे .बाकी सर्व
नेत्यांनी जनतेला लुबाडून जे कमावलं ते आपल्या नंतरच्या पिढीसाठी राखून ठेवलं .परंतु बाबासाहेब याला
अपवाद आहेत .असा युगपुरुष पुन्हा होणे नाही आणि म्हणून जगात ज्याचा गाजावाजा असा फक्त एकाच साहेब
आणि ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर .तर घराणेशाही पद्धती ( Dr Babasaheb Ambedkar's family information : before and after )बद्दल थोडक्यात माहिती
१ ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल आयुष्य पणाला लावुन बहुसंख्य समाजाच्या उत्थाना साठी कार्य केले.
त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना पत्र लिहुन सांगितले की, माझी व्यक्तिगत संपत्ती असलेली माझे
दादर येथिल घर ( राजगृह ) , खार मधील के. एम कॉलनीतील घर वेळ आलीतर विका पन पैशा अभावी चळवळ
थांबवू नका?
( संदर्भ - चरित्र ग्रंथ )
२) सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी 1954 साली दिल्ली न्यायालयात न्यायमूर्ति कुमार यांच्या कडे कोर्टात
संपत्ती मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केस टाकली व ती चालवली त्याचा बाबासाहेबानवर
भरपूर मनस्ताप झाला !
( संदर्भ - सवितामाई आंबेडकर चरित्र )
३) डॉ. बाबासाहेब यांनी मृत्युपत्र तयार केले, त्यात त्यांनी राजगृह बंगला सवितामाई आंबेडकर यांना दिला व
खार मधिल बंगला भैय्यासाहेबांना उर्वरीत मुकुंद आंबेडकर यांना व्यक्तिगत संपत्ती वारस केले . लोकवर्गनितुन
निर्माण झालेल्या संस्था समाजाला त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्याना चालविण्यास सांगितले .
( संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन, प्रकाशन - महाराष्ट्र शासन )
४) कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वान झाल्यावर त्यांच्या जीवन
संघर्षाचा ठेवा पुढील पिढीला कळवा म्हणून , चैत्यभुमी , दिक्षाभुमी , महाड़ चवदार तळे स्मारक समित्या लोक
वर्गनितुन निर्माण केल्या , ह्या समित्या ताब्यात घेण्यासाठी आंबेडकर बंधु संघर्ष करताना समाजाने पाहिले.
( संदर्भ- आंबेडकर नंतरची चळवळ )
५) पुणे धम्मभूमि , सातारा भिमाई भूमि , येवला मुक्तीभूमि हे डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन
झालेल्या जागी तेथिल स्थानीक लोकांनी स्मारक समित्या बनविल्या त्याच्यात सुद्धा ताबा मिळावा म्हणून ट्रस्ट्री
विरुद्ध आंबेडकर बंधू संघर्ष करताना समाजाने पाहिले आहे.
( संदर्भ- सम्राट पेपर )
कारभार सांभाळत आहे , त्यांनी कुठेही दिवाळखोरी केली नाही असे असताना त्या संस्थावर कबजा
मिळविण्यासाठी समर्थकांना सांगण्यात येते . अशामुळे चाँगल्या चाललेल्या डॉ.बाबासाहेबांच्या ुनिर्मित संस्था
वादात सापडतात ुुहे आंबेडकर बंधु संघर्ष करताना समाजाने पाहिले.
७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स यावर पुस्तक लिहुन समाजाला दिशा दिली की ,
कमुनिस्ट आनि समाजवादी विचारधारेचे लोक नआपल्या चळवलीला घातक आहेत. आणि त्यांना दूर ठेवा. असे
सांगुन सुद्धा डॉ. आंबेडकर भवन हा समाजातला अंतर्गत वाद आहे, त्याच्या साठी कम्युनिस्टांना सोबत घेन हि
चळवलीला पुढे घातक ञठरनारी गोष्ट आहे !
८) डॉ.बाबासाहेबानचे दापोली येथिल घर व रमाबाई यांचे घर येथिल स्थानीक गावकरांनी ट्रस्ट बनवुन त्याची
देखभाल करतात तिथे सुद्धा आंबेडकर बंधुंनी ताबा मिळविण्यासाठी समर्थकांना ुभिडवले?
( संदर्भ- सम्राट पेपर )
९) साहित्यिक अर्जुन डांगळे हे अँड- प्रकाश आंबेडकरांकडे अनेक वर्ष होते त्यांच्या कडे काही फायदा नाही
झाला नाही म्हणून ते रामदास आठवलेंच्या पक्षात गेले, तिथेही त्यांना आमदारकी मिलाली नाही म्हनुन शिवसेने
सोबत गेले आनि आता समाजाच्या आपसातल्या वादात शिवसेनेला उतरविले , ज्या साहित्यिकांना समाजाला
दिशा देण्याचे काम केले पाहिजे ते समाजामधे आग ओतण्याचे काम करीत आहेत.
आहे.व सामाजाला मार्गदर्शन करण्याचा आहे.
११) डॉ.आंबेडकर साहित्य प्रकाशन महाराष्ट्र शासन यांना आंबेडकर बंधूनी मागणी पत्र दिले कि शासन जे काही
बाबासाहेबांवर साहित्य छापले त्यावर रॉयलटी पाहिजे असा दावा केला आणि जे लोक बाबासाहेब नावावर
सौंस्था काढतील त्या सौंस्थेला आमच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल असे बंधन करा अशी शासनाला
मागणी केली. ह्याच्या विरोधात पँथर कार्यकर्ते योगेंद्र गजबे यांनी एकाकी लढा दिला आणि ते जिंकले.
१२ ) भारतीय बौद्धम महासभा हि त्यांनी जुन्या ट्रस्ट विरुद्ध दादागिरी करून ताब्यात घेतली व त्याचा धम्म
प्रचारच्या आढ घराणेशाही चा प्रचार करण्यात आला. त्याच्या विरोधात जुन्या ट्रस्ट ने कोर्टात दावा दाखल केला व
ती केस हाय कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जिंकली. यांना त्या ट्रस्ट चे नाव वापरणे आणि त्याचा उपयोग करणे
बंदी आणलेली आहे. तरी सुद्धा ते कायद्याच्या विरोधात जाऊन काम करतात आणि आंबेडकर भवन च्या
बाबतीत लोकांना कायदा सांगतात.
१३ ) पिपल्स एजुकेशनच्या जुन्या ट्रस्ट ने रामदास आठवले यांना अध्यक्ष पदावर नेमणूक केली, हे कळताच
आंबेडकर बंधूनी मुंबई, महाड,औरंगाबाद येथील महाविद्यालयात आपले समर्थक पाठवून ट्रस्ट ला त्रास देऊन
काम करण्यास मज्जाव केली, त्यांनी विद्यार्थांच्या भविष्याचा विचार न करता त्यांना त्रास देऊन ते बंद पाडण्याचा
प्रयत्न केला. ट्रस्ट ने हाय कोर्टात केस केली, कोर्टाने आहे त्या ट्रस्ट ला काम करुद्या जैसे थे ठेवा तरी यांनी
भानगडी चालू ठेवल्या. डॉ.बाबासाहेब यांनी निर्माण केलेल्या उद्देशाला महत्व द्याच कि वारशाचा
महत्वकांशाला..??
१४ ) पिपल्स इम्प्रुवमेंटच्या ट्रस्ट ने वारंवार सांगितले कि प्रिंटिंग प्रेस हि ट्रस्ट कडे भाड्याने होती, त्यावर कोणी
विश्वास ठेवला नाही आता मुंबई महापालिकेच्या महापौरांनी भाडे कायदे अंतर्गत भाडोत्र्याला नोटीस देऊन
बांधकाम पाडायला हवे होते असा अधोरेखित करून त्यांच्या बांधकाम परवानग्या नाकारल्या, ह्याचा अर्थ
महानगर पालिकेला माहित होते कि प्रिंटींग प्रेस भाड्याने होती, वास्तवात प्रिंटिंग प्रेस ''महेश भारती'' नावाच्या
व्यक्तीला चालवायला दिलेली आहे. आंबेडकर बंधू यांना प्रेस ची जागा ट्रस्ट कडे भांड्याने आहे हे माहीत
असताना सुद्धा त्यांनी स्वतःच्या महत्वकांशाल महत्व दिले...??
१५ ) बहुजन समाजामध्ये शैक्षणिक, आर्थिक,सामाजिक अश्या असंख्य समस्या आहेत आणि गावोगावी अन्याय
अत्याचार मोठ्या प्रमाणात चालू आहेत. बाबासाहेब यांचे वारस म्हणून त्यांच्यावर समाजाची जबाबदारी आहे तरी
त्यांनी वेळोवेळी कधीच त्याविरोधात आंदोलन उभारले नाही उलट त्यांनी स्वतःच्या महत्वकांशाला जात महत्व
देत आले आहे.
कोणाची करावी लागेल.? चळवळीचा उद्देश बदलता येत नाही पण नेतृत्व नेहमी चळवळीला बदलत असतं हि
गंभीर समस्या..!!
विषय - डॉ.बाबासाहेबानी दिलेल्या चळवळीच्या दिशेने वाटचाल करायची की , आंबेडकर बंधुंच्या
व्यक्तिगत राजकारणाला चळवळ समजायचे.?
" एक चिंतन चर्चा "
" बौद्धजन पंचायत समिती भोईवाडा येथे डॉ.बाबासाहेबानी लोक वर्गनितुन जमीन घेतली तेथे त्यांचा वावर होता
त्यांची बसण्याची खुर्ची , काठी तेथे आहे. पन समितिचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात ती वास्तु
पाडून नविन आंबेडकर भवन बाँधन्याचे काम चालू आहे. एका बाजुला आंबेडकर बंधु बाबासाहेबांचे पदस्पर्शाने
पावन झालेली प्रेस पाडली म्हणून मोर्चे काढतात व तेथे पंचायत येथील पावन झालेली भवन पाडूुन नविन
उभारण्याचा सम्राट व लोकनायकला जाहिराती करतात हे दोन न्याय कसे ? विचार करा.
( संदर्भ- सम्राट पेपर )