The Buddhist Society of India The Buddhist Society of India - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, March 22, 2017

The Buddhist Society of India

" दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया " या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामर्थ्यशाली बौद्ध समाज निर्माण

करण्याकरीता स्थापन केलेल्या संस्थेचे सदस्य व्हा !


<img src="The Buddhist Society of India.jpeg"= The Buddhist Society of India - dr ambedkar">

→ का म्हणून सदस्य व्हायचे ?

→ का म्हणून ही संस्था सर्व बौद्ध समाजाला एकत्रित करु शकणारी एकमेव संस्था आहे ?

→ आजही समाजाची सामाजिक व शासकीय स्तरावर ओळख जातीची आहे, दलित आहे का बौद्ध आहे ?

→ आजही शाळेत प्रवेश घेताना,जनगणनेत नोंद करताना, शिक्षण-नोकरी तसेच इतर क्षेत्रातील घटनात्मक    तरतुदी मिळवित असताना कोणती ओळख दाखवावी लागते ?

→ जातीची, दलित असल्याची का बौद्ध असल्याची ?


→ " बौद्ध " ओळखीमधे असे कोणते (धार्मिक,आर्थिक व राजकीय) राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फायदे बौद्धांना प्राप्त  होणार आहेत जे *हिंदू* या ओळखीमुळे प्राप्त होणार नाही??

→ आजही सामाजिक स्तरावर आणि वृत्तपत्रामधून समाजाची जातींचा दर्प असलेली *दलित- बहुजन* ओळख मिडियाद्वारे जाणीवपूर्वक का प्रस्तुत केली जाते ?

→ समाजाची स्वाभिमानी- जगतवंदनीय " बौद्ध " ओळख मिडियाकडून का प्रस्तुत केली जात नाही?? या मधे जातीयवादी हस्तकांचा कोणता फायदा आहे?

→ दलित व जातीच्या ओळखीमधे स्वाभिमान आहे का जगामधे प्रसिद्ध पावलेल्या " बौद्ध " ओळखीमधे स्वाभिमान व आत्मसन्मान आहे?

→ आजही समाज म्हणून आपण अल्पसंख्याक आहोत का बहुसंख्याक? बौद्ध म्हणून लगेच बहुसंख्याक होण्याचा कोणता मार्ग डॉ बाबासाहेबांनी सांगितला आहे??

→ आजही समाज शिक्षण,नोकरी, उद्योग,आरोग्य या व्यवस्थासाठी आपला समाज इतरांवर अवलंबून आहे का स्वावलंबी झालेला आहे??

→ स्वावलंबी होण्यासाठी धर्मांतरीत बौद्ध ही ओळख अतिमहत्वाची का आहे??

या सर्व प्रश्नांची उत्तरे  *दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया* च्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सापडतात.

→ आपल्या विभागात शिबीर आयोजित करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा..

→ जाणून घ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध ओळख का दिली?

→ जाणून घ्या *दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया* या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या साठी स्थापन केलेल्या संस्थेचे महत्त्व.

अधिक माहितीसाठी संपर्क करा..

सचिन शुभ्रसागर

राष्ट्रीय समन्वयक

*दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया*

रजि नं ३२२७/५५ एफ 982

मोबाईल: 914 614 33 34