23 March 1931 shahid din 23 March 1931 shahid din - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, March 23, 2017

23 March 1931 shahid din

क्रांतीवीर भगतसिंग,राजगुरु आणि सुकदेव या तीनही भारतमातेच्या वीर पुत्रांना 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली.क्रांतीवीर भगतसिंग यांना फाशी देण्याच्या अगोदर काही प्रसंग असे घडले जे आजही  प्रेरणा देणारे आहेत

<img src=”23-march-1931-shahid-din.jpg” alt=”bhagat singh rajguru sukhdev shahid din”/>

प्रसंग-१

           क्रांतिकारक भगतसिंग म्हणतात,

          जे तरुण दैववादी असतात

          ते नामर्द असतात

          आणि जे तरुण विज्ञानवादी असतात

          ते खरे मर्द असतात.

तुरुंगात असतांना भगतसिंगांना जेलरने सांगितलं की,आता तुला फाशी होणार शेवटी जगाचा निरोप घेतांना

तरी देवाची प्रार्थना कर,तेव्हा भगतसिंग म्हणाले जेलरसाहेब आयुष्यात कधी देवाकडे दयेची भिक मागितली

नाही.आणि मरतांना जर मी देवाकडे प्रार्थना केली.तर लोक म्हणतील "अरे देखों भगतसिंग मरनें से डर रहां है"

मृत्यू डोळ्यासमोर नाचत असतांना सुध्दा एवढा करारी बाणा भगतसिंगांमध्ये होता.

प्रसंग-२

फाशीचा दिवस 23 मार्च निश्चित झाला.विर भगतसिंग,राजगुरू,सुकदेव यांना बातमी मिळाली.मृत्यू आता अटळ

असतांना भगतसिंगांनी आपल्या आईला पत्र लिहिले.त्या पत्रात भगतसिंग लिहितात, " माँ कल मुझे फाँसी

होनेवाली है,तो माँ मेरी लाश लेंने आप मत आना कुलबीर(भगतसिंगांचा लहान भाऊ) को भेंजना अगर आप

आयीं तो आप मेरी लाश देखके रोयेंगी... तो यह देखके दुनियाँ कहेंगी देखों भगतसिंग की माँ रो रहि है"

प्रसंग-३

फाशीचा दिवस ठरला 23 मार्च 1931.फाशीच्या तक्त्यावर वीर भगतसिंगांना नेण्यात आले आणि त्यांना शेवटची

इच्छा विचारण्यात आली. त्यावेळी वीर भगतसिंग यांनी "इन्कलाब जिंदाबाद"चा नारा देत आपल्या साथीदार

राजगुरु सुकदेवा यांच्या सोबत गीत म्हटले : मेरा रंगदे बसंती चोला


           मेरा रंगदे बसंती चोला

           मेरा रंगदे बसंती चोला

          मेरा रंगदे बसंती चोला

          ये है चोला जिसमे रंग

          रंग चढेना दुजा

          बचपन से ही की थी

          इस चोले की पुजा

          हम वापस आयेंगे लेकर

          आजादी का डोला

        मेरा रंगदे बसंती चोला

       मेरा रंगदे बसंती चोला

त्याचवेळी फाशी देणाऱ्या जल्लादाच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला "भगतसिंग मैने आजतक बहुतसे

लोगो को फाँसी दी मगर मैंने तेरे जैसा शक्स पहिली बार देखा बहुतसे लोग यहाँ आकर रोंये बहुतोंने मुझसे दया

की भिख मांगी किसीने पैर पकडे,कोई गिडगिडाये किसीने माँ,बाप,बहन,भाई,बिवी,बच्चों से मिलनेंकी,इच्छा

जताइ कइ यहाँसे भाग गये मगर भगतसिंग मैंने आजतक तेरे जेसा मर्द नही देखा"

भारतमातेचे महान सुपूत स्वातंत्र्यवीर भगतसिंग,राजगुरू सुकदेव यांच्या बलिदान दिन 23 मार्च 

निमित्ताने त्यांच्या महान कार्याला व स्मृतीला विनम्र अभिवादन !