दुसर्या कोणाचातरी ?
या प्रश्नांची उत्तर देण सहज शक्य नाही .कारण भारतातील जनतेला हे रामराज्य नाही हे कळत असत तर जे
आता चालू आहे ते कोणाच राज्य आहे ? हे मात्र माहीत नाही .
या भारत देशान २६ जानेवारी १९५० रोजी राजेशाही नाकारली आणि लोकशाही स्वीकारली .त्यामुळे ना
मराठ्यांच ,ना मुस्लीमांच, ना ब्रिटीश इँग्रजांच,ना कुठल्या जाती धर्माचं राज्य ; भारतानं स्वीकारल राज्य तमाम
भारतीयांच .भारतात आता लोकांच राज्य आल .धर्म निरपेक्ष, जातविरहित , अस. मानवतेच अस सर्वांच राज्य
आल .पण आल म्हणताना थोड दुःख होत .कारण या ७० वर्षात खरी लोकशाही ,लोकांच राज्य आलच नाही .इथ
राज्य चालल फक्त हिंदूंच ( प्रामुख्याने ब्राह्मणांच ) अर्थात रामाच .तरीही आज सर्वत्र अस वातावरण आहे की
आता रामराज्य येईल .जरी राम हे एक काल्पनिक पात्र असल तरीही काही मतलबी ( ब्राह्मणांनी ) हेतून
वाढविलेले पात्र आणि त्याची कथा जी रामायणात मांडली आहे ती जणू एखाद्या मसाला मुविच अवतरण आहे .
ठीक आहे त्याकडे लक्ष दूर करून जरा आपण रामाची स्टडी / अभ्यास करू
राम राज्य येईल अस बोलणा-यांनो सहज येईलहि रामराज्य हो ,पण याचाच दुसरा अर्थ " लोकराज्य जाईल
".लोकशाही नष्ट होईल .आणि राम राज्य येईल म्हणजे काय होईल याची कल्पना तरी आहे तुम्हाला ? रामाची
नेमणूक होईल .अर्थात एक राजा नेमला जाईल .आणि आता हा राजा कोण असेल बर ? मुस्लीम ?बौध्द ?ख्रीश्चन ?
मांग ? चांभार ? की मराठा ?
तर नाही या पैकी एकही नसेल .कारण लोकशाही मार्गान सत्ता मिळवून (भ्रष्टाचार करून) बघा सत्तेतले राजे
कोण आहेत .रामराज्याचे समर्थक .हिंदू . नरेंद्र ,देवेंद्र, शहा , साध्वी , साक्षी महाराज , साधू ,सन्याशी,जोशी
,कुळकर्णी इ. पण कदम ,पवार ,भोसले , जाधव इ. नाही .
बरं काय केला होता रामान पराक्रम ? शिवाजी महाराजांनी परस्त्रीला वाईट हेतून हात लावणा-याचे हात कलम
केले होते .आणि त्या बहिणीला साडीचोळी देऊन सन्मानान बाईज्जत स्वगृही धाडले होते . पण रामान शुर्पनखेचे
नाक आणि स्तन कापून अपमानीत केले होते (नाक कापणे याचा नेमका काय अर्थ आहे माहीत आहे का ?
जेव्हा पालक आपल्या मुलीला बोलतात कि "तू नाक कापल्यास आमचं" हे केव्हा बोलतात ते आता तुमच्या
लक्षात आलेच असेल) .सीतेला रावणाकडून सोडवून आणले ,परंतु सीतेची अग्नी-परीक्षा घेऊन अविश्वास
दाखविला .राम जर देव होता तर अंतःर्ज्ञानानच त्यान सितेला पवित्र असल्याच घोषीत करायला हवे होते .इतके
करुनही एका धोब्याच्या वायफळ बडबडीन पुन्हा शंकाधीन होऊन सिता गरोदर असतानाही तीला फसवून
वनात एकटीला सोडले .तीला श्वापद खातील आणि आपोआप ब्याद टळेल या हेतून .अशा प्रकारे स्त्रीजातीचा
सन्मान न करणा-या , हलक्या कानाच्या रामाचे राज्य हवे ?
राम कट्टर जातीयवादी होता .याच उत्तम उदाहरण म्हणजे शंबूकाचा वध .
,वेद मंत्र उच्चारण्याचा अधिकार हिंदू धर्मान नाकारला होता .एका बामणाचा मुलगा मरण पावला .त्या बामणान
रामरायाकडे कैफियत मांडली की क्षूद्र शंबूकान जप करण चालू केल्यामुळच माझा मुलगा मेला .मला न्याय द्या
.रामान मागचा पुढचा विचार न करता तपश्चर्येत मग्न असलेल्या बेसावध निरपराध शंबूकाचा बाण मारून वध
केला .त्याला मफी मागायचीही संधी दिली नाही .याला म्हणायच का राम राज्य .आमच्या शिवरायांनी तर
शत्रूलाही अभय दिल .जेंव्हा शत्रून शरण येवून जीवदान मागितल . सुग्रीव आणि वाली या दोन भावांमधील वाद न
मिटवता एकाच भावाची एक बाजू ऐकून एकाला रामान मारल .तेही झाडाच्या मागे लपून , पाठीत बाण मारला .
आमच्या शिवरायांनी न्याय निवाडा करून निरपराध्यांना कधीच त्रास दिला नाही . अपराध्याला सोडल नाही.
योगी आदित्यनाथ यांनी दूध गोमूत्रान सरकारी निवासाची शुध्दी केली अणि रहायला गेला .का तर म्हणे आधीचे
मंत्री शुद्र होते .बहुजनांनो विचार करा कोणाच राज्य येत आहे ? खरय तुमच बाबांनो रामराज्य येत आहे ,पण
रामराज्यात आपल स्थान काय असेल ? याचा विचार नाही केलात तर पुन्हा लंगोटावर फिरायची वेळ येईल .हे
भविष्य नाही बर का . तुमच्याच कर्माच फळ असेल .मराठाही क्षूद्र आहे .हे विसरू नका .रामराज्याला विटाळ
आहे क्षुद्राचा .राम राज्य म्हणजे शिक्षण बंदी ,संचार बंदी ,मूक्त व्यवसाय बंदी ,कर्मकांड, कट्टर जातटात ,रोटी
बंदी ,,बेटी बंदी ,एकंदरीत बहुजनांची बरबादी .
धर्माचा माणूस जो समतेन ,ममतेन, न्यायान वागेल. जगेल तो.आणि राम राज्य हिंदूंच आहे .त्यात केवळ बामण
बनियांच वर्चस्व आहे ,बाकी सगळे क्षूद्र .निच .विषमता , शोषण हाच रामराज्याचा मुख्य पाया आणि तोच मान्य
नव्हता शिवरायाना आणि भीमरायाला .
या स्वतंत्र भारतात लोकशाही असताना ,लोकांनी आपले चांगले प्रतिनिधी निवडावे म्हणून प्रत्येकाला मतदानाचा
समान हक्क असताना लोकशाही स्वीकारल्या पासून खरी लोकशाही राबवणारे चांगले लोक निवडता नाही आले
आपल्याला ,ते राजे चांगले निपजतील ? निवडण्याचा अधिकारच नसेल तुम्हाला .रामराज्य येईल तेंव्हा . आजच
जागे व्हा . आणि लोकहो संविधानान राजे केलेत तुम्हाला .हे राजेपण गमावू नका .संविधान वचवण्यातच आहे या
देशाच भल .सावध व्हा, मनुवाद्यांनी कधीच कुणाच भल नाही केल .गुन्हेगार होते का संत तुकाराम महाराज
,शिवाजी महाराज ,शंभू राजे,ज्योतिबा फुले ,शाहू महाराज ,बुध्द , डॉ बाबासाहेब आंबेडकर ,संत कबीर ,
पानसरे ,कलाबुर्गी, दाभोळकर ? केलेना अपमान ,खून यांचे .
अजूनही मनसुबे तेच आहेत यांचे .संविधान संपले की रामराज्यच चालेल त्यांचे. गळे दाबले जातील
मानवतावाद्यांचे .
बहुजन व्हा रे सावध .
होऊ नका या शिका-यांचे पारध .
हे लढणार नाहीत तुमच्याशी दोन हात करून .
पाठीत खंजर खुपसुन टाकतील मारून .
बघा ना विचार करून...
धम्म मित्र : वसंत कासारे .