शिवजयंती शिवजयंती - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, February 19, 2017

शिवजयंती

<img src="shiv-jayanti.jpg" alt="chhatrapati shivaji maharaj janmotsav shivjayanti"/>


भारतात अनेक राजे महाराज होऊन गेले पण ज्याच्या नावाचा दबदबा अजूनही कायम आहे असा राजा फक्त

एकच आणि तो म्हणजे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण " छत्रपति शिवाजी महाराज ".त्यांना माझा मनाचा

मुजरा !

" जयंती " हा शब्द काही नवीन नाही पण याचा संदर्भ जुना आहे . आज आपण भारतभर सर्व महापुरुशांचा

जयंती सोहळा साजरे करतो. पण का करतो ,एक तर आपण त्यांचा आदर करतो आणि त्यांनी केलेली कार्य हि

सर्वासमोर मांडतो व प्रचार करतो जेणेंकरू लोकांना त्यापासून प्रेरणा मिळेल आणि असाच विचार त्याकाळी

राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी केला होता.

जेव्हा १८६९ साली म फुले रायगडावर शिवाची समाधी शोधायला गेले आणि सलग तीन दिवसानंतर त्यांनी एक

समाधी पाहून आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिथे त्यांना महाराजांच्या समाधीवर बांधलेल्या कुत्र्याची समाधी

दिसली . हि वैदिक परंपरेची परंपरा आहे हे त्यांना कळून चुकले होते. पुढे त्यांनी ती कुत्र्याची मूर्ती हटवून संपूर्ण

जागा साफ सफाई केली.व धुवून स्वच्छ केली . महाराजाच्या समाधीस अभिवादन केले आणि त्यांच्या समाधीवर

पुष्प वाहिली पण हे ( कपटी ) ब्राह्मणांना न पटणारे होते म्हणून ते ज्योतीबांना म्हणाले तो शूद्र काय राजा होता

आणि असा राजा होऊच शकत नाही आणि त्यांनी त्या महाराजांच्या समाधीवरील पुष्पांना लाथेने उडवुन दिली .

ज्योतीबांनी त्याच फार दुःख झाले पण ज्योतीबांनी त्यांना न जुमानता आपले महाराजांना  वंदन चालूच ठेवले .

मग त्यांनी आपल्या " सत्यशोधक समाज " (  २४ सप्टेंबर १८७३ स्थापना  ) मार्फत लोकांना जागृत

करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना या कर्मकांडातून बाहेर पडायचं असेल तर सत्यशोधक मध्ये सामील व्हा

अस आव्हान करू लागले आणि मग त्यांनी १८७४ साली प्रथमच पुणे आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर " 

शिवजयंती " साजरी होऊ लागली .आणि तीही सलग दहा दिवस जेव्हा शिवजयंतीची सुरुवात झाली त्यावेळी

काही बाळं रांगत होती.पण इथल्या स्वताला तथाकथित समजणार्या लेखकांनी असा पराक्रम केला कि

शिवजयंती हि बाळानीच सुरु केली आणि इथली अज्ञानी लोकांनी ती मानायला हि सुरुवात केली .आणि पुढे याच

बाळांनी महाराजांची जयंती बंद व्हावी यासाठी वैदिक कर्म-कांड पुढे केलं आणि लोकांना भाग पाडलं दुसर्या

दहा दिवसाचं अर्थात  गणेश-उत्सवाचं (१८९३ पासून ).

पण आता काळ बदलावा आणि डॉ बबसाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराच्या जोरावर

इथली जनता शिकली,सावरली व त्यांनी आपल्या राज्यांचा खरा इतिहास पुन्हा एकदा उकरून प्रकाश झोतात

आणला  आणि आपल्या राजाची खरी प्रतिमा मांडू लागले .शिवाजी राजे हे मुस्लिम द्वेषी नव्हते नाही ते कुठल्या

धर्मा विरुद्ध होते.राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं त्यांनी स्वताच्या रयतेच्या रक्षणासाठी

स्वराज्य उभारलं होत.आणि म्हणून त्यांना " रयतेचा राजा " म्हणूनही संबोधिले जाते.     

बर्याच परिश्रमानंतर इतिहासकारांनी शिवाजी महाराजांची जन्म इंग्रजी कॅलेंडर तारीख शोधून काढली आणि ती

१९ फेब्रूवारी १६३० निश्चित करण्यात आली आणि लोकांमध्ये एकाच जल्लोष पसरला तेव्हापासून शिवजयंती हि

१९ फेब्रुवारीला थाटामाटात साजरी होऊ लागली . पण इथल्या तथागत्यांना हे पटणारे नव्हते म्हणून ब्राह्मणाचा

कॅलेंडर चालविणार्याने एक युक्ती काढली कि शिवाजी महाराजांची जन्म तारीख हि तिथीनुसार म्हणजेच ३० मार्च

१९३० असलीच पाहिजे आणि त्यानुसार जयंती ३० मार्चला करायला पाहिजे . यासाठी त्यांनी (ब्राह्मणांनी ) त्यांचे

राजकारणी चमचे मोहरे म्हणून वापरले आणि मोठा घोळ आणि वाद आपल्या राजेंच्या जयंतीचा घालून ठेवला

आहे .

थोडा विचार केला तर जर आपण लग्न , परीक्षा , जन्म - मृत्यूचे ,स्वताचा किंवा आपल्या अपत्याचा वाढदिवस ई

जर तारखे नुसार करतो तर शिवजयंती का नको तारखेनुसार . मुळात त्यांना इथेच आपले कसब (कपातीपणा )

दाखवायचा आहे .जर का ते यात यशस्वी झाले तर पुन्हा एकदा मनुस्मृती आपल्या डोक्यावर नाचायला वेळ

लागणार नाही

शिवरायांच्या ऐतिहासिक कामगिरीवर नजर टाकली तर असं दिसत तर छत्रपती शिवाजी महाराजान्नी त्यांच्या

अवघ्या तिस वर्ष्यांच्या कार्यकाळात जगाला आश्चर्यचकित कराव अश्या स्वराज्याची निर्मिती केली . सह्याद्रिच्या

दर्या खोर्यात , समस्त बहुजन समाजाला बरोबर घेउन , सगळ्या जातीधर्माला सोबत घेउन महाराष्ट्राच्या

काळ्याभुमित शेतकर्याच राज्य निर्माण करणार्या शिवरायान्नी जेव्हा स्वताचा राज्याभिषेक करण्याच ठरवल ,

तेव्हा महाराष्ट्रातिल पुरोहित मंड्ळीन्नी त्यांच्या राज्याभिषेकास " शुद्र " म्हणुन विरोध करत तुम्हाला राजा होता

येणार नाही असा आग्रह धरला . झाडुन महाराष्ट्रातिल पुरोहितवर्गाने राज्याना विरोध केला हा इतिहास आहे.

शिवरायानि हा अपमान संयमानी पचविण्यासाठी युक्ती करुन काशीच्या गागाभट्टाकरवी 6 जुन 1674 ह्या दिवशी

स्वताचा राज्याभिषेक करून घेतला,यात त्यांनी पुरोहितांवर अमाप पैसा खर्च केला पण त्यांच्या मनाला कधीही

समाधान लाभल नाही . कस लाभेल ? तिस वर्षे , तळहातावर जिव ठेवत स्वराज्य निर्माण करणार्या राज्याचा

अपमान झाला होता .कस समाधान वाटेल त्या राज्याला ? शेवटी हा राज्याभिषेकाला लाथ मारत 24 सप्टेम्बर

1674 ह्या दिवशी शिवरायान्नी आपला दुसरा राज्याभिषेक बौद्धधम्मानुसार करून घेतला . बौद्धधम्मातिल शाक्त

पंथानुसार केलेल्या ह्या राज्याभिषेकाला राज्याना काहीही खर्च लागला नाही हे विषेश. शिवरायांचा खरा

राज्याभिषेक म्हणजे बौद्धधम्मानुसार झालेला राज्याभिषेक होय . बौद्धधम्मानुसार राज्याभिषेक करत आपले

महान पुर्वज सम्राट बळी राजा आणी सम्राट अशोकाच्या विचारांचा आणी कार्याचा खरा वंशज असल्याची साक्ष

दिलेली आहे .

त्यामुळे "शिवजयंती " असल्या वादात न पडता आपल्या राजाचा सन्मान आणि आदर करणेच गरजेचं 

आहे आणि शिवजयंती हि ऐतिहासिक पुराव्यानुसारच्या तारखेप्रमाणेच म्हणजेच १९ फेब्रुवारीलाच 

साजरी व्हायला पाहिजे आणि त्यांचे मनसुबे हाणून पाडले पाहिजे कारण आता आपण वैचारिक आणि 

वैज्ञानिक युगात वावरत आहोत . 

शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करून

त्यांच्या  काही ओळी पुढील प्रमाणे :

'महाराज आम्हासी बोला। धरला का तुम्ही अबोला।।

मावळे गडी सोबतीला। शिपाई केले उघड्याला।।

सोसिले उन्हातान्हाला। भ्याला नाही पाऊसाला।।

डोंगरकंगर फिरला। यवन जेरीस अणला।।

लुटले बहुत देशाला। वाढवी आपुल्या जातीला।।

लढवी अचाट बुद्धीला। आचंबा भूमीवर केला।।

बाळगाजरी संपत्तीला। तरी बेताने खर्च केला।।

वाटणी देई शिपायाला। लोभ द्रव्याचा नाही केला।।

चतुर सावधपणाला। सोडिंले आधि आळसाला।।

लहानमोठय़ा पायला। नाही कधी विसरला।।

राजा क्षेत्रांमध्ये पहिला। नाही दुसरा उपमेला।।

कमी नाही कारस्थानीला। हळूच वळवी लोकांला।।

युक्तीचे बचवी जीवाला। कधी भिईना संकटाला।।

चोरघरती घेऊ किल्ल्याला। तसेच बाकी मुलखांला।।

पहिला झटे फितुराला। आखेर करी लढाईला।।

युद्ध नाही विसरला। लावी जीव रयतेला।।

टळेना रयत सुखाला। बनवी नव्या कायद्याला।।

दाद देईन लहानसानाची। हयगय नव्हती कोणाची।।

आकृती वामनमूर्तीची। बळापेक्षा चपळाईची।।

सुरेख ठेवण चेहर्‍याची। कोंदिली मुद्रा गुणरत्नाची।।

ज्योतिराव फुल्यानें गाईला पुत क्षुद्राचा।

मुख्य धनी पेशव्याचा।।

जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा। पवाडा गातो शिवाजीचा।।

कुळवाडी-भूषण पोवाडा गातो भोसल्याचा।

छत्रपती शिवाजीचा।।'


शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जाती-धर्मातील जनतेचे राज्य होते. त्यांच्या राज्यात कधीही भेदाभेद नव्हता. 

कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व बहुजनांचे राजे होते. 

आज त्यांची जयंती असून त्यांच्या जयंतीदिनी आपण सर्वजण त्यांना मानाचा मुजरा करून वंदन करूया 

व शिवजयंती साजरी करूया.


जय शिवराय! जय भीमराय !