बौद्ध धम्म स्वीकारताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा बौद्ध धम्म स्वीकारताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 27, 2016

बौद्ध धम्म स्वीकारताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा

<img src="22-pratigya-by-dr-ambedkar.jpg" alt="dr b r ambedkar adopts buddhism and gives 22 pledges to followes"/>


१४ ओक्टोम्बर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजाला

सन्मानीय असा बौद्ध धम्म दिला आणी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढींना लाताडून नवीन बौद्ध समाज

निर्माण केला जो आज नाव बौद्ध म्हणून आज सन्मानाचं जीवन जगात आहेत .

तरी काही अजूनही याला अपवाद आहेच .अशांसाठी बाबा साहेबांकसाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा नेहमी

स्मरणात ठेवाव्यात .

1 मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

2 मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

3 मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार         नाही.

4 देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.

5 गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.

6 मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.

7 मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.

8 मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.

9 सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.

10 मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.

11 मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.

12 तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.

13 मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

14 मी चोरी करणार नाही.

15 मी व्याभिचार करणार नाही.

16 मी खोटे बोलणार नाही.

17 मी दारू पिणार नाही.

18 ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.

19 माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या     
   हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.

20 तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

21 आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

22 इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.