अंधभक्त - एक स्मार्ट गेम | andhabhakt - a smart game अंधभक्त - एक स्मार्ट गेम | andhabhakt - a smart game - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, September 3, 2024

अंधभक्त - एक स्मार्ट गेम | andhabhakt - a smart game

 




        अंधभक्त हा खेळ लेकी बोले सुने लागे या उक्तीने खास आंबेडकरवाद्यांसाठी डिझाईन केला गेला होता. सुरूवात " येस आय अ‍ॅम अ ट्रोल" या स्वाती चतुर्वेदी या लेखिकेच्या पुस्तकाने झाली. आपण सर्वांनी हे पुस्तक आणि त्याच्या अनुवादक मुग्धा कर्णिक यांना डोक्यावर उचलून घेतले. आपला आनंद इतकाच कि यांनी आपला कट्टर शत्रू भाजप आणि टोळीला इक्स्पोज केले. मग आपण मागेपुढे न पाहता यांना आपले नेते बनवले. नेता फक्त राजकीय नसतो. नैतिक, धार्मिक,सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कामगार, शेतकरी इ. आंदोलनाला नेता असावा असतो. 

        आपण यांना धार्मिक , राजकीय आणि आर्थिक सोडून इतर क्षेत्रातले नेता म्हणून मान्य केले. यांचे नैतिक वर्चस्व मान्य केले. नैतिक वर्चस्वामुळे झाले असे कि समाजात हे लोक ट्रेण्ड सेटर बनले. 

        यांनी कुणी काय खावे हे पाहण्य़ाचा अधिकार नाही हा ट्रेण्ड आणला. कुणी काय कपडे घालावेत या अधिकाराबद्दल बोलण्याचा ट्रेण्ड आणला. वर वर पाहता हे ट्रेण्डस व्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित आहेत. पण नैतिकतेचे पाठ सांगण्याचे अधिकार एकदा का तुम्ही त्यांच्याकडे दिलेत कि मग अंधभक्त, ट्रोल नावाने वावरणारे लोक आंबेडकरवाद्यांवर बोट ठेवणार आणि म्हणणार कि मग यांना कसे काय तुम्ही वेगळे न्याय लावता ?

हा वेगळा न्याय काय ?

तर गणपती बसवला म्हणून भाऊ कदमला दम दिला.

लोकांच्या सणावर टीका टिप्पणी.

लोकांकडे सत्यनारायणाला न जाणे, गेल्यास पूजेला नकार देणे.

या कृतीला सुद्धा अंधभक्तांच्या लेव्हलला आणून ठेवण्यात आले. आणून ठेवणारा नैतिक दृष्ट्या आभाळाएव्हढ्य़ा उंचीचा. त्याच्या शब्दाला एखाद्या देवाप्रमाणे आलेले महत्व.

मग आंबेडकरवादी टाहो फोडणार. हजारो जण समर्थन करणार्या पोस्टी लिहीणार. हे फक्त इग्नोर मारणार आणि तुम्हाला किरकोळीत जमा करणार. किंवा एक स्मायली टाकणार. 

तुमच्या पोस्टवर यांच्या चौथ्या पाचव्या, सहाव्या फळीतले कुणी पाटील, देशमुख येऊन उकसवणारा प्रश्न विचारणार. या पाटलाच्या घरची बायको उंबरा ओलांडून चहा द्यायला पण येत नसती. आलीच तर पाटलाच्या जनरेतल्या जरबेने मागे फिरत असती.

पण हा पाटील फेसबुकवर पाठ झालेल्या पुरोगामी स्टाईलने तुम्हाला अडाणचोट प्रश्न विचारणार. त्याचा बालमेंदू पाहता त्याला एका ओळीत उत्तर देऊन काय कळणार ? मागचं सगळं सांगत बसावं तर दुसर्या कमेण्ट मधे दुसरा पाटील येऊन तोच प्रश्न विचारणार.

मित्रांनो, हे चुकून होत नसून यामागे एक निश्चित अशी रणनीती आहे. त्या त्या तथाकथित पुरोगामी पक्षाची ही रणनीती आहे. त्यांची सुद्धा ट्रोल आर्मी आहे ज्यांनी कधी "येस आय अ‍ॅम अ ट्रोल " या पुस्तकाचे मार्केटिंग करून ट्रोलवर आभाळ हेपलले होते. त्याच मंथनातून अंधभक्त ही टर्म आली.

अंधभक्त ही टर्म एकदा प्रस्थापित झाली कि अंधभक्तांना वैशिष्ट्ये चिकटवली गेली. त्यात आमचे आंबेडकरवादीही सामील व्हायचे. त्यांना प्रोत्साहन दिले गेले. शाबासी दिली गेली. त्यामुळे ते डबल चेकाळून पोस्टी टाकत सुटायचे. हा काळ जो कुणी अंधभक्तावर जोक मारेल तो पुरोगामी असा साधा सोपा पुरोगामी बनण्य़ाचा होता.

मग हळूच आंबेडकरवाद्यांच्या गणपतीला असलेल्या विरोधामागचा बिनडोकपणा, १४ एप्रिलचा आवाज या गोष्टी आणून यांच्यात पण ही वैशिष्ट्ये आहेत हे हळूच लक्षात आणून दिलं. मग यांच्या शेवटच्या फळीतल्या लोकांनी त्यावर टीका केली. खुद्द सनातन्यांनी टीका केली.

मग यांच्यात आणि अंधभक्तात काय फरक आहे असे हे हळवे पुरोगामी विचारू लागले. 

हा खेळ आमच्या आंबेडकरवाद्यांच्या आजही ध्यानात येत नाही आणि ते स्पष्टीकरणं देत बसतात. ही स्पष्टीकरणं अनुल्लेखामुळे हास्यास्पद झालेली आहेत. शिवाय पुन्हा पुन्हा तुम्ही स्पष्टीकरणं देत बसलात तर त्याच्यातली हवा फुस्स होऊन जात असते. 

त्यामुळे हा खेळ एक्स्पोज करण्याची गरज आहे.

जे स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात ते काय शहाणे आहेत हे मांडायला पाहीजे. 

या विषयावर जमेल तसे लिहा. अनुभव लिहा. पोस्टी लिहा. हे रॅकेट एक्स्पोज करा. 

गावोगावचे गावगुंड आम्हाला पुरोगामित्व शिकवायला लागलेत त्यांना चपलेने हाणून आरसा दाखवा.

साभार - मंदार माने 




No comments:

Post a Comment