१९५५ सालापासून चालू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र Maharashtra चळवळीची यशस्वी सांगता १ मे १९६० रोजी झाली. गुजरातचा Gujarat दावा डावलून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हे शल्य गुजराती समाज आजवर बाळगून आहे . तोंडात साखर ठेवून व्यवहार करणारे गुजराती बांधवाचे हे खरे रुप भोळ्या महाराष्ट्राला कधी कळलेच नाही. मुंबईत वास्तव्य करणाऱ्या मोरारजी देसाई, जयवंतीबेन मेहतां सारख्या गुजराती नेत्यांच्या वक्तव्यांतून ते डोकावत राहिले. अर्थात त्यास बाळासाहेब ठाकरेंनी योग्य शब्दांत ठाकरी भाषेत उत्तर दिल्यानंतर मराठी तरुण सुखावला व जैसे थे झाला. त्यातील ' गर्भित अर्थ ' त्याच्या वा राजकीय पक्षाच्या लक्षातच आला नाही का ?
मुंबई, महाराष्ट्रातील व्यापारधंद्यात जम बसलेले गुजराती, जैन, मारवाडी बांधव हे एकाच भौगोलिक प्रदेशातील . व्यापार, पैसा, त्यांचे राहणीमान , आचार विचार, व्यापारी स्वभाव, भाषा , कट्टर धार्मिक संस्कृतीत फारसा फरक करता येत नाही. हे सारे एकाच माळेचे मणी. त्यामुळे या समाजास या लेखापुरते ' गुजराती ' संबोधुया.
या ' गुजराती ' समाजास मोदी सत्तेवर आल्यापासून उन्माद चढला आहे ! लोकल ट्रेन असो वा बस, हॉटेल असो की थिएटर ठिकठिकाणी तो जाणवू लागला आहे. देशाचे पंतप्रधान बनलेल्या मोदींनीही महाराष्ट्रासह मुंबईतील महत्वाच्या संस्था, कार्यालये, आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा सपाटा लावला. गुजराती व्यापाऱ्यांना , उद्योजकांना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन करत,मुंबईत बहरलेला हिरे बाजारही सूरतला घेवून गेले. पंतप्रधान मोदी गुजराती बनून, महाराष्ट्रावर सूड उगवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मुंबईवर सत्तेची पकड कायम राखण्यासाठी, वास्तव्य मुंबईत व उद्योग धंदा गुजरातमध्ये करणे सोपे जावे म्हणून वेगवान बुलेट ट्रेन आणली. आणि एकप्रकारे मुंबई गुजरातला जोडण्याचा पहिला टप्पा पार पाडला. हे करताना बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या खर्चाचा अधिकांश वाटा महाराष्ट्राच्या बोडक्यावर टाकला. यासाठी मुंबईस्थित गुजराती समाजाचा हातभार न लागता तर नवलच होते. मुंबई महाराष्ट्रापासून अलग करण्यासाठी दक्षिण व पश्चिम मुंबईतून मराठी समाजाच्या हाती असलेल्या प्रॉपेर्टीजवर कब्जा मिळवताना पैशाच्या जोरावर, बहुसंख्यांकवादाने एकटे पाडत, तर कधी दहशतीचा वापर केला गेला. मुंबईत अजून मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांनी पश्चिम मुंबईत सर्व सार्वजनिक व व्यावसायिक पाट्या गुजराती केल्या आहेत . इतकेच नव्हे तर मुंबई महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांची नावे गुजराती भाषेत आली तरी आम्ही अजून झोपलेलोच आहोत. भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रातच ठेवत ( कारण आता मुंबई पुन्हा गुजरातकडे सुपूर्द करण्याची घोडचूक धूर्त मोदी करणार नाहीत ), परंतु व्यापारीदृष्ट्या महाराष्ट्रापासून तोडत मुंबईला गुजरातशी जोडण्याचे काम अगदी योजनाबद्ध रितीने, ठरल्याप्रमाणे चाललेले दिसते आहे. गुजरातला मोदी हरप्रकारे सढळ हाताने मदत करत वर आणण्याचा आटापिटा केंद्राद्वारेपण करत आहेत आणि हे सारे महाराष्ट्राच्या उरावर बसून होत आहे, ते अधिक संतापजनक आहे.
ज्या मुंबईने धीरूभाई अंबानीला उद्योगपती बनण्यास प्रोत्साहीत केले , ज्या बहुसंख्य मराठीजनां सह मुंबईकरांनी, ज्या कष्टाने, बुद्धीमत्तेने, मेहनतीने रिलायन्सला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले त्याचे सर्वेसर्वा बनलेल्या धीरुभाईंचे चिरंजीव मुकेश/ अनिल अंबानी ज्या नगरीच्या कुशीत जन्मले, वाढले, फळफळले, त्यांनी रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे असे उघडपणे सांगण्याचे धैर्य दाखविले. यास कृतघ्नपणा म्हणावा की निर्लज्जपणा ? डिएसकें ना बरबाद करुन लोढा ला मुक्तहस्ते मुंबई आंदण दिली गेली . तर आज मिठागरांची, मुंबई बंदराची हजारो हेक्टर शासकीय जमिन , धारावीसारखा आंतरराष्ट्रीय विकास प्रकल्प अदानीअंबानी हाती सोपविले जात आहे. आज गोरेगाव येथील मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी, ५० एकरवर पसरलेली शासकीय दूध डेअरी ' महानंद ' ची सूत्रे गुजरातमधून हलवली जात आहेत, यापरतें दुसरे दु:ख काय असावे ? राज्यशासनाच्या ताब्यातील महाराष्ट्रातील शाळांचा गणवेशाचे कापड आणि शिलाई गुजराती मारवाड्यांच्या हातात देण्याचे घाटत आहे. महाराष्ट्रातील मुंबईची कापड उद्योगातील शान गेल्यावरही भिवंडी , मालेगांव, इचलकरंजीतील कपडा उद्योग जोरात होता . पण तोही बंद पाडून महाराष्ट्राला आर्थिक खाईत लोटण्याचे कारस्थान केंद्राच्या आशिर्वादाने व राज्याच्या भक्तांनी शिजवले आहे.
आज महाराष्ट्रात, आपल्याच घरात खावून पिवून वाढलेला, समृद्ध झालेला, गुजराती, जैन व मारवाडी समाज एक होवून प्रादेशिक अस्मितेचा गंड बाळगत, मराठी माणसालाच, मालकालाच अपमानास्पदरित्या वागवतो आहे, चेपतो आहे, लुटतो आहे.
गुजराती अस्मितेने पछाडलेल्यांनी, मराठी मुलखातून कमावलेल्या बक्कळ पैशाच्या/भांडवलाच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रातील कच्च्या मालाची व उत्पादनांची बहुतांश पुरवठा आणि विक्री व्यवसायात मक्तेदारी राखून मराठीजनांच्या व्यवसायवृद्धीच्या मर्यादेची दोरी आपल्याच हाती ठेवली. त्याच्याच आधारे महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगास नामोहरम करण्याचा उद्योग सुरु केला. परप्रांतीय प्रतिस्पर्ध्यास अधिक पुरवठा करुन, महाराष्ट्रीय उद्योजकास कच्च्या मालाचा तुटवडा करून वा महाग करुन महाराष्ट्रातील उत्पादकतेवर घाला घातला आहे. त्यास साथ मिळते आहे जीएसटी, इन्कमटॅक्स, इडी सारख्या केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या यंत्रणांची. नाविन्यपूर्ण कल्पकतेने निर्मिलेले व वाढती मागणी असणारी वा निर्यात होणारी उत्पादने हेरून त्यावर जीएसटी, इन्कमटॅक्स खात्याच्या धाडी टाकत हैराण करुन , धनवान गुजराती समाजाच्या हाती ' बनाबनाया लड्डू ' देत आहे. सर्वप्रथम बॅंक अकाउंट ताब्यात घेतली जातात, अव्वाच्या सव्वा येणे दाखवून ताबडतोब पैसे भरायला सांगतात ( अशक्य रक्कम ) नाहीतर संचालक किंवा मालकाला कोठडीत टाकतात. खरेदीदार , पुरवठादार वित्तपुरवठा करणारे इत्यादींची चौकशी सुरु करुन , बाजारातली पत घालवतात. चुकीचा किंवा खोट्या रकमेचा अनियमिततता दाखवून अव्वाच्या सव्वा रकमेच्या भरपाईची मागणी करतात. जी करण्यास मालक /संचालक असमर्थ असतो नाहीतर, किती काळ जेलची हवा खावी लागणार , या भीतीने महाराष्ट्रीयन मालक हार खातो. व दंडाइतका पैसा उभा करु शकणाऱ्याच्या हाती नाईलाजाने हतबलतेने कारखान्याच्या, व्यवसायाच्या चाव्या देतो. हे वित्तपुरवठादार कोण असतात हे वेगळे सांगायला नको . सध्या महाराष्ट्रात हे चालले आहे.
महाराष्ट्रावर आधी चोरपावलाने होणारे आर्थिक आक्रमण, दिल्लीश्वरांच्या मदतीने आता अधिक उघडपणे होवू लागले आहे.
महाराष्ट्रीयन व्यापारी व उद्योजकांना त्रास देवून त्यांचे उद्योगधंदे बंद पाडून वा खच्चीकरण करुन, आर्थिक घडी विस्कटून टाकण्याच्या डावासह, अजून एक आक्रमण संपूर्ण महाराष्ट्रावर होत असताना दिसते आहे .
आज तळगाळातील माणसाच्या दैनंदिन जीवनातील गरजेच्या बहुतांश वस्तु पदार्थ आता गुजरात ' मेड ' येत आहेत . आज तुम्ही कोणत्याही दुकानात जावून कोणतेही पाकिट वा वस्तु बघा ८०% ' मेड इन ' गुजरात आहेत . यापूर्वी मिळणारे महाराष्ट्रीय ओळख असणारे , चव, स्वादाचे पदार्थ, वस्तु हळूहळू कधी गायब केल्या गेल्या हे कळले देखील नाही . ( महाराष्ट्राची आवडते रावळगाव चॉकलेट अंबानीने नुकतेच ताब्यात घेतल्याची बातमी पाहिली असेलच ) तसे आधीपासूनच कपडालत्ता असो वा किराणा, तेल असो वा घरगुती वापराच्या बहुतांश व्यापारावर पगडा गुजराती समाजाचाच होता. पैशाचे पाठबळ असल्याने व्यवसायात पुरवठादार ( stockist
) , वितरक (
Distributor ) बहुतेक गुजराती जैन मारवाडी असल्याने , संपूर्ण बाजार त्यांच्याच हातात गेला आहे. स्थानिक असलेल्या किरकोळ दुकानदारांस भरपूर कमिशनचे आमीष दाखवत, स्पर्धक असलेली खात्रीलायक, उत्तम अशी स्थानिक उत्पादने दूर सारली जात आहेत. अधिक फायदा कमावण्याच्या नादात, किरकोळ दुकानदार चकचकीत वेष्टनातील ' सुमार ' गुजराती उत्पादने महाराष्ट्रातील ग्राहकाच्या गळ्यात मारत आहे . त्याच वेळी स्थानिक बाजारपेठेतील उत्पादित माल न घेता ' गुजरात ' चा माल दुकानातून विकताना किरकोळ दुकानदार व खरेदी करणारा ग्राहक, महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान करुन, आपल्याच पायावर धोंडा मारुन घेत आहे. गुजराती मारवाडी लॉबीकडे आज बहुतांश जीवनोपयोगी व लक्झरी अशा वस्तु पदार्थांचे कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी मालाच्या मोठ्या ब्रॅंड्सचे होलसेल मार्केट स्टॉक व डिस्ट्रिब्युशन सिस्टीममुळे हातात आहे. त्या जोरावर ते कोणत्याही रिटेल दुकानदाराला नमवू शकतात . त्यांना हवा तो माल घेण्यास व विकण्यास भाग पाडू शकतात ही वस्तुस्थिती आहे.
गुजराती मारवाडी व्यापारी, त्यांना लागणारा इतर माल लॉबींग करत, त्यांच्याच समाजातील व्यापाऱ्याकडून खरेदी करतात. त्यामुळे त्यांचा पैसा त्यांच्याच समाजबांधवाकडे राहातो. अगदीच नाईलाज असेल तर इतर विक्रेत्याकडून खरेदी केला जातो. पिढ्यानपिढ्या व्यापारात असल्याने प्रचंड पैसा गुजराती मारवाडी समाजाच्या गाठीशी आहेच. पण त्यांच्यात असलेली व्यवसायिक, व्यावहारिक शिस्त ही समाजातील बंधूंना मदतीच हात देण्यासाठी वापरली जाते. हे कौतुकास्पद आहे. गुजराती , जैन मारवाडी समाजात असलेली धार्मिकता ही एक समाज म्हणून आपसातील बंधुभाव वाढवणारी गोष्ट असते . त्यांच्या गावात असलेल्या मंदिरास अगणित दान मिळत असते, त्या दानपेटीतील रकमेचा वापर, त्याच गावच्या, त्या समाजाच्या कोणासही व्यापार वृद्धीसाठी लगोलग उपलब्ध करुन दिला जातो. ( त्याची परतफेड करण्यासाठी महिन्यातून एकदा गावातील मंदीराला न चुकता भेट देणारे मारवाडी ) त्यामुळे कोणत्याही शहरात असलेली मोक्याची जागा , दुकान एका रात्रीत विकत घेण्याइतके भांडवल, ते उभे करु शकतात. *धार्मिकतेची, मंदिरांची समाजाच्या भौतिक प्रगतीशी, घातलेली ही व्यावहारिक सांगड नक्कीच अनुकरणीय आहे.*
तसेच या ' गुजराती ' समाजाने शिक्षणात घेतलेली आघाडी त्यांच्या भविष्यवेधी बुद्धीची चुणुक दाखवते .
*' स्त्री ही घराची लक्ष्मी असते ' या संदेशाचे महत्व गुजराती समाजाला पटल्यामुळे त्याचे अनुकरण करणे चालू केले आहे.* व्यापारातून मिळवत असलेली संपत्ती टिकून रहावी , कुटुंबस्तरावर आर्थिक स्थैर्य प्राप्त्त व्हावे आणि भावी पिढी, अमाप पैशाने न बिघडता, त्यांनी शिक्षण घेवून, मिळालेल्या संपत्तीची योग्य गुंतवणुक व वृद्धी व्हावी म्हणून ' शिक्षित मराठी मुली ' सूना म्हणुन आणण्याचा क्रांतिकारी व व्यावहारीक प्रघात पडत आहे. ' मराठी स्त्रिया कितीही कमी पगार असला तरी मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसूर न ठेवता आहे त्या पैशांत घर चालवत असतात ' या गुणांचा अभाव गुजराती समाजाच्या मुलीं मध्ये आढळतो ' त्यामुळे हा पायंडा पडताना दिसत आहे.
आज बाजारातील प्रत्येक विकाऊ मालाचे पर्यायी उत्पादने तयार करुन , त्याची वितरण व्यवस्था , विक्री व्यवस्थापन करून , कपड्यापासून काडेपेटीपर्यंत, अन्नधान्यां पासून तेल मसाल्यापर्यंत, महाराष्ट्राची *संपूर्ण बाजारपेठ* गुजराती हातात जाण्याचा धोका संभवतो आहे. आणि ७० वर्षांपूर्वी ' भांडी घासा आमची ' या घोषणेप्रमाणे , खरोखरच मराठी माणसावर फक्त मेहनत मजूरी करण्याची पाळी येण्याची भीती वाटते आहे .
चांगली स्थानिक उत्पादने बाजूला सारून किरकोळ विक्रेत्यां ना गुजरात वरुन येणारा, ' मेड इन गुजरात ' उत्पादने विकण्याशिवाय पर्याय ठेवत नाही .
मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गरज न उरल्याने एकीकरण समिती बरखास्त झाली. त्याचवेळी महाराष्ट्र राज्याच्या नवीन जडणघडणीस सुरुवात होताना, मुंबईतील कपडा व किराणा व्यापारात असणारे वर्चस्व, गोड तोंड व पैशाचा वापर करत ' गुजराती ' समाज मुंबई गमावल्याचा अपमान गिळून टाकत व्यवसायात हळूहळू पसरला. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेशी सलगी करत, देणग्या देत गुजराती जैन मारवाडी व्यापारी मुंबईत टिकाव धरुन राहिला. मराठी तरुण नुकताच उद्योग व्यवसायात पदार्पण करत होता, व्यापारी जगतातील व्यवहारांच्या खुबी ,मराठी माणसास ' घाटी ' अशी हाक मारणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांकडून शिकत, आर्थिक फटके खात, अपमान जिरवत, शिकत होते.
*हा गुजराती मोदीचा आर्थिक दहशतवाद आज महाराष्ट्र , मराठी दुकानदारी गिळू पहातोय .याची वेळीच दखल घेवुन, मराठी तरुणांनी स्वत:च्या हिंमतीवर , बुद्धीचातुर्य व कौशल्याने, ' गुजराती ' समाजाने लादलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात ' आर्थिक स्वराज्य ' स्थापन केले पाहिजे !*
आजच्या महाराष्ट्रात शिक्षित, उद्यमी, धडाडीच्या तरुणांची खाण आहे . मात्र गुजराती मुलांना जसे व्यापाऱ्यातील चतुराईचे, व्यवस्थापनाचे, प्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षणाचे बाळकडू घरातूनच मिळते तसे मराठी तरुणास मिळत नाही ही वस्तुस्थिती ध्यानात घेवून , अनुभवी मराठी व्यापार तज्ञांनी एकत्र येत, मराठी तरुण मुलामुलींना देवाण घेवाणातील वाटाघाटी व्यवस्थापनाविषयक ( निगोशिएशन्स स्किल ) शिकवले गेले पाहिजे, आर्थिक धन उभारणी व संवर्धन, तसेच विविध व्यवहारपद्धती, जोखीम घेण्याचे तंत्र, याचबरोबर साखळी वा जाळे पद्धतीने उभारलेल्या व्यापार व्यवस्थापनेचे धडे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या व्यावहारिक पद्धतीने ( प्रॅक्टिकल ) दिले तर महाराष्ट्र राज्यातील जनता स्वयंसिद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
या लेखात लिहिल्याप्रमाणे सरसकट सर्वच गुजराती जैन अथवा मारवाडी समाज महाराष्ट्रद्वेष्टा किंवा महाराष्ट्रावर आर्थिकदृष्ट्या कबजा करण्याच्या या कारस्थानात सहभागी आहे असा माझा दावा नाही. त्यास काहीजण अपवाद असतीलच . परंतु गुजराती जैन मारवाडी समाजातील व्यावहारिक शिस्त व व्यापारी धडे शिकून , त्यांचे इतर गुण हेरुन , अभ्यासून महाराष्टीय तरुण तरुणींनी महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावा व भविष्यात येणारे संकट टाळावे !
साभार -रमण दवते
डोंबिवली.
#rajkaran
#gujarat
#maharshtra
No comments:
Post a Comment