कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सहभागी होऊन मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्व स्तरांवर
प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
पावसाच्या साक्षीने मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला सुरुवात. संभाजीराजे भोसले, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत
पाटील यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील समन्वयक, शासकीय नियुक्त्या रखडलेले उमेदवार, विद्यार्थी व मराठा
समाजासहीत इतर समाजांचे बांधवही नेते सहभागी
कोल्हापूरचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी देखील आवाहन केले, "मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संभाजीराजे एकटे लढत आहेत. सर्व मंत्री, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे एकजूटीने उभे राहून त्यांना बळ दिले पाहिजे,"
आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर (अध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी) यांनीदेखील उपस्थित राहून मराठा समाजास
आपला पाठिंबा दर्शविला.
आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात सहभागी झालो. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. राज्य व केंद्र सरकारने सर्व उपाय तपासून योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा असे आम्ही आवाहन करतो.विविध समूहांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १९५१ साली दिलेल्या दोराईराजन निकालाचा फेरविचार होणे गरजेचे आहे, हे पुन्हा याठिकाणी नमूद करतो.- ऍड.प्रकाश आंबेडकर (अध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी)
स्वतःच्या नातवाला सत्तेच्या खुर्चीत बसवण्यासाठी एक आजोबा पावसात भिजला तर संबंध मिडिया रात्रंदिवस
प्रचारासाठी भिडलां आणि समस्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली...!!
आजोबांचं पावसात भिजणं हे मतलबी होतं, सत्तेच्या खुर्चीसाठी होतं, स्वतः ची तिसरी पिढी राजकारणात
आजोबांचं पावसात भिजणं हे मतलबी होतं, सत्तेच्या खुर्चीसाठी होतं, स्वतः ची तिसरी पिढी राजकारणात
भरभक्कम करण्यासाठी होतं हे वास्तव जो पर्यंत जनतेला समजतं नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तन कशाला
म्हणतात त्याची समज येतं नाही...!!
तुलनात्मक दृष्ट्या पावसात भिजण्याचाच विषय घेऊन तुलना करायचीच असेल तर आज राजर्षी छत्रपती शाहू
महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज दोघेही भरपावसात मराठा आरक्षणासाठी छत्रपती शाहू
महाराजांच्या समाधी स्थळी कोल्हापूर ला मुकमोर्चा साठी पावसात भिजले. या दोन्ही वंशजांना मराठा आरक्षणातून
वैयक्तिक लाभ मिळवायचा नाही,सत्तेची खुर्ची मिळवायची नाही, मात्र वंचित समाज घटकांना न्याय मिळावा म्हणून
झटतं आहेत,अशा कृतीचा परिणाम असा होतो की, समाजातील तळागाळातील आणि सर्वसामान्य तथा वंचित
समुहाच्या मनात सत्यासाठी चालविलेला प्रयत्न याची साक्ष पटते आणि म्हणूनच मग सामाजिक परिवर्तनाची बीजं
मना मनात रुजतात आणि सामाजिक परिवर्तन घडून येते...!!
आज कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू
आज कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू
अॅड बाळासाहेब आंबेडकर हे मराठा आरक्षणासाठी एकत्र येऊन भरपावसात भिजले ही घटना सामाजिक
परिवर्तनाची नांदी ठरणारी आहे....!!
- भास्कर भोजने - वंचित बहुजन आघाडी
- भास्कर भोजने - वंचित बहुजन आघाडी
आजच्या आंदोलनातील काही क्षणचित्रं...
No comments:
Post a Comment