पाया याच शतकात पूर्ण होणार हे निश्चित कारण त्यांचा उद्धारकर्ता १४ एप्रिल १८९१ रोजीच जन्माला
होता.आपल्या शिक्षणाने आणि विद्वात्तेने संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशोविदेशार ख्याती मिळविणारे डॉ
बाबासाहेब आंबेडकर हे इथल्या शिक्षित पीडित समाजाचे नेतृत्व उभे राहिले.आजपर्यंत ज्यालोकांच्या सावलीचा
देखील विटाळ होत असे अश्याच जातीच्या मुलानं शिक्षणाच्या एवढ्या पायऱ्या चढून स्वतःला विद्वान बुद्धिमान
म्हणून सिद्ध केलं आणि केवळ जातीच्या आधारावर फुशारकी मारणाऱ्यांच्या न कळत थोबाडीत
मारण्यासारखंच आहे . जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजातील लोकांना जागृतीचा काम सुरु
केलं तेव्हा त्यांना जाणवलं कि आपल्या समाजाच्या भावना किंवा अन्याय अत्याचार आदी घटना कोणत्याही
वृत्तपत्रात येत नाहीत किंबहुन हि पाक्षिक दखलही घेत नाही. कारण मुळात या वृत्तपत्रावर ब्राह्मण आणि बनिया
लोकांचं वर्चस्व होत आणि ते लोक वृत्तपत्रे एक कमाई करण्याचं साधन मानत आणि त्यानुसारच त्यात
जाहिरातींचा वापर होत असे .तर देशात शोषित पीडित असलेल्या लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा
कोण फोडणार आणि अश्यातच "मूकनायक"चा जन्म झाला .महाराष्ट्रात तेव्हा लोकमान्य टिळकांचा "केसरी"चा
दबदबा होता आणि त्याच्यापुढे मूकनायक म्हणजे ... पण तरीही हे वृत्तपत्र काढण्याचा निर्णय डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी घेतला .लोकशिक्षण आणि लोकसेवा हि वृत्तपत्रांची मूलभूत प्रेरणा असते त्यातून समाज धारणेचे
महान काम करता येऊ शकते असा विश्वास डॉ बाबासाहेब आंबेडकरांना होता .
डॉ बाबासाहेब आंबेडकर तेव्हा सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते आणि त्यामुळे ते
यावृत्तपत्राचे संपादक म्हणून स्वतः न राहता त्यांनी महार जातीचाच शिक्षित तरुण पांडुरंग नंदराम भटकर
संपादक म्हणून काम पहिले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक मध्ये "मनोगत" मध्ये लेख लिहून प्रसिद्ध
केला.तो दिवस होता ३१ जानेवारी १९२०.आज बरोबर १०० वर्षे या गोष्टीला उलटूनही त्याच किती महत्व आहे हे
आपल्याला यातून जाणवते बाबासाहेब पहिल्याच पाक्षिकात लिहितात कि आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत
असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना सोपविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग
असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना सोपविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग
यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानसारखी अन्य भूमीच नाझी परंतु मुंबई मध्ये निघत असलेल्या
वृत्तपत्रांकडे काढण्यात येणाऱ्या वृत्तपत्रांकडे पहिले असता असे दिसून येईल कि त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट
अश्या जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिटाची पर्वा त्यांना नसते.इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा
त्यांना हितकारी असेही त्या\त्यातून प्रताप निघतात.अश्या पत्रकांना आमचा इशारा आहे कोणतीही एखादी जात
अवनत झाली तर तिच्या अवनतीच्या चट्टा इतर जातीस वाढल्याशिवाय राहणार नाही.

कारण "मूकनायक" हे पाक्षिक जे अस्पुश्य समाजाच्या न्याय हक्क संबंधित आवाज उठविणार पाहिलं
पाक्षिक होत.जरी याचा वाचक वर्ग खासकरून अस्पृश्य समाज कमी असला तरी हे प\क्षिक बाबासाहेबानी
लिहिलंय म्हणजेच नक्की काहीतरी विशेष असणार म्हणून इतर वर्गाचे लोकही खरेदी करत. मूकनायकाने
लवकरच सर्वांचे लक्ष वेधून घेतलं .
"मूकनायक"च्या व्यवस्थापन मंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सीताराम शिवतरकर, बाळाराम
"मूकनायक"च्या व्यवस्थापन मंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सीताराम शिवतरकर, बाळाराम
आंबेडकर, बाळाराम खडकर, संभाजी गायकवाड, संभाजी संतुजी वाघमारे,व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ
घोलप आदींचा समावेश केला होता.या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा
आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या
लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी
तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी
अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२०
रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले.
"मूकनायक" काही वर्षातच बंद पडले तरी त्यातून ज्या विविध प्रश्नावर अग्रलेख पत्रव्यवहारातून जे विचारमंथन
झाले ते त्या काळातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण समजावून घेण्याच्या दृष्टीने
ऐतिहासिक स्वरूपाचे आहे .मूकनायकामुळे अस्पुश्यांच्या परिस्तिथीशी निगडित समस्यांची जनमनात पोहचली.

मूकनायक बंद पडल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल १९२७ रोजी "बहिष्कृत भारत" या
पाक्षिकाची सुरुवात केली. आणि पुढे बहिष्कृत भारत बंद पडल्यावर २४ नोव्हेंबर १९३० रोजी 'जनता"
पाक्षिकाची सुरुवात केली. याच जनवत्व पवक्षिकाच नामांतर ४ फेब्रुवारी १९५६ रोजी "प्रबुद्ध भारत " असं
करण्यात आलं .
वर्षभरापूर्वीच बंद पडलेलं "प्रबुद्ध भारत" पुन्हा एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच वंचित बहुजन
आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा सुरुवात केली.
No comments:
Post a Comment