महात्मा फुले जयंती महात्मा फुले जयंती - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, April 11, 2017

महात्मा फुले जयंती

<img src="mahatma-jyotirao-phule-jayanti.jpeg"=Mahatma Phule jayanti-shubhechcha">

इ.स.1869 मध्ये रायगडावरील छञपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंती

साजरी करणारे ...

शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे....

मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणारे.....

पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करणारे...

बहुजनाचे पहिले कैवारी....

समता..बंधुताचे न्यायकरी....

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु....

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..........!!!

विद्येविना मती गेली ।

मतीविना निती गेली ।।

नितीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।।

वित्ताविना शूद्र खचले ।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।


"बहुजन समाजाच्या -हासाचे कारण,केवळ पिढ्यान् पिढ्या असणारे 'अज्ञान'हेच आहे." हे ओळखून शिक्षणाची

'ज्ञानगंगा' बहुजन समाजाच्या घरोघरी पोहोचवण्या साठी,आयुष्य पणाला लावणारे द्रष्टे समाजसुधारक....

मानवमुक्तीच्या लढ्यात योगदान देणा-या हया महामानवास विनम्र अभिवादन..!

काही बहुजनांसाठी ज्यांना ११ एप्रिल हा दिवस बहुजनांचे कैवारी महात्मा फुले यांचा जन्म दिन माहीत नाही पण

ज्याने कोणासाठी तीळ मात्र हि काम केलं नाही व जो फक्त एक काल्पनिक पात्र आहे असा हनुमान ,त्याची

जयंती म्हणून साजरी करण्याच्या शुभेच्छा देणाऱयांसाठी पुढील काही वाक्य आहेत ...

११ एप्रिल - क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले या महामानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल - एका सत्यशोधकांचा जन्म दिवस.

११ एप्रिल - २०० वर्षे झाकुण ठेवलेली रायगडावरील छत्रपती शिवराय यांची समाधी शोधुन पहिली शिवजयंती

साजरी करणाऱ्या महापुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल - छत्रपती शिवराय यांच्या जीवन चरित्रावर पहिला पोवडा करणाऱ्या शाहीराचा जन्म दिवस.

११ एप्रिल - भारतरत्न , कायदे तज्ञ, संविधानकार डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या महागुरू चा जन्म दिवस.

११एप्रिल - मुलींना शिक्षणाची दरवाजे ऊघडी करून देणाऱ्या शिक्षकाचा जन्म दिवस.

११ एप्रिल - स्त्री शिक्षणात व इतर समाज कार्यात स्वत: च्या पत्नीला खंबीरपणे ऊभे करणारे महामानव यांचा

जन्म दिवस.

११ एप्रिल - सतीची चाल, केश वपन इत्यादी समाजातील अनिष्ठ चाली-रितींचा नायनाट करणाऱ्या

समाजप्रबोधनकार यांचा जन्म दिवस.

११ एप्रिल - उच्चभ्रु ब्राम्हण संस्कृती ने निर्माण केलेल्या शुद्र-अतिशुद्र या गलिच्छ विचारांचा नाश करून

माणसांना माणसात बसवणाऱ्या महा-मानवाचा जन्म दिवस.

११ एप्रिल - दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वत: ची विहीर सदैव बहाल करणाऱ्या महा-पुरूषांचा जन्म दिवस.

११ एप्रिल - बहुजण समाजाला सर्व क्षेत्रापासुन वंचित ठेवणारे खरे दुश्मन शोधुन बहुजण समाजाला सत्याचा मार्ग

दाखवणाऱ्या महासंशोधकांचा जन्म दिवस .

|| जय जोती जय क्रांती ||