(what is in name? ) याचा फार गूढ अर्थ होता . तर इकडे भारतात नावातच सर्व काही आहे . कारण नावामुळेच
ओळखला जातो कि हा व्यक्ती कोण आहे आणि कोणत्या जातीतला आहे . तर यालाच ब्राह्मणवादाचा मुख्य पाया
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही .कारण याला आपणच ( बहुजन सगळे ) जबाबदार आहोत . कसे तर पाहू ..
पुर्वी कोणाही बहुजनांच्या घरी मुल जन्माला आले की त्याचे नाव ठेवण्यासाठी ब्राम्हणाकडे जायचे व आजही
बरेच आहेत जे जातात( फक्त बौद्ध समाज सोडला तर ,त्यातही काही असतील पण फारच कमी प्रमाणात ) व
ब्राम्हण सांगेल त्याप्रमाणे मुलाचे किंवा मुलीचे नाव ठेवले जायचे. त्याच नावामध्ये गुलामी, दास्यत्व किंवा निर्रथक
व हलक्या दर्जाचा उद्बोध होईल अशीच असायची. जरा पाहू कि आपल्या बहुजन पुर्वजांचे ब्राम्हणसुचित काही
नावे पुढे दिली आहेत त्यावरविचार व चिंतन करा.
केरू, केरूंभाऊ, केरूजी, दगडु, दगडुजी, कचरू, कचरनाथ, कचरूजी, धोंडु, धोंडुजी, धोंडुभाऊ, भिकाजी,
ठकाजी, म्हसाजी, भागुजी, काळुजी, बारकू इ . जर का याचा अर्थ पाहिला तर तो असा येईल ....
दगडु म्हणजे दगड
कचरु म्हणजे कचरा
म्हसाजी म्हणजे रेडा
बारकू म्हणजे बारीक
काळुजी म्हणजे काळा
धोंडु म्हणजे मोठा दगड
ठकाजी म्हणजे ठक भामटा
भागुजी म्हणजे पळुन जाणारा
भिकाजी म्हणजे भिक मागणारा
अजूनही काही निर्रथक नावे देखिल पुढीलप्रमाणे आहेत ...
नाथाजी, कोंडाजी, गेंदाजी, पुंजाजी, आवडाजी, रुंजाभाऊ, पुंजाभीऊ, पुनाजी, सुभाजी, खंडुजी, रंभाजी, बुधाजी,
खेवजी, रेवजी, रखमाजी इत्यादी.काही समाजामध्ये तर चक्क ढोल्या, वाकड्या, सुरक्या, बारक्या, काल्या,
डुकऱ्या, म्हशा, शिंगऱ्या, माकड्या ,सुकड्या अशी नावे असतात.आता याचा अर्थ तुम्ही काढू शकता कारण
आज तुम्ही शिक्षितही आहात.
आता तशीच बहुजनांच्या बायकांची देखिल तशीच निर्रथक नावे...
बारकाबाई, पवळाबाई, पवळा, छबूबाई, छबू, ढबु, ढवळाबाई, धोंडनबाई, काळुबाई, झुंबरबाई, रंगूबाई,
सकुबाई, ठकुबाई , रूंजाबाई, बकुबाई.... इत्यादी व अशी बरीच नावे जी ब्राम्हण स्रियांची नसतात. वरील नावे व
इतरही ज्यांचा उल्लेख यात केलेला नाही अशी बहुजनांची नावे ही ब्राम्हणांची नावे नसतात प्रयत्न करा बघा
तुम्हाला सापडतात का.?
आपल्या बहुजनांच्या ज्या ज्या महापुरूषांनी ब्राम्हण व त्यांनी निर्माण केलेली वर्णव्यवस्था, देव, धर्म, शुभ,
अशुभ कर्मकाऩ्ड, जातीव्यवस्था, जन्म-पूनर्जन्म व अनेक अवैज्ञानिक काल्पनिक गोष्टींना प्रखर विरोध केला अशा
महापुरूषांची नावे ब्राम्हऩांची कधीच नसतात.
जसे कि बहुजन महापुरूष : शिवाजी, संभाजी, शाहू, जोतिबा, भिमराव, रोहिदास, तानाजी, शाहु, शाहुजी,
शहाजी, लहुजी, जिवाजी, मालोजी.संत :नामदेव, तुकाराम, तुकडोजी , सावता, इत्यादी
देव : खंडोबा, महादेव, भैरोबा, हनुमान, मारूती, पंढरीनाथ, रवळनाथ, मच्छिंद्रनाथ, नवनाथ, अशी अनेक तुम्ही
खालील नावे कधी ब्राम्हणांची एेकलीत का....?
शहाजी पुरंदरे
खंडोबा जोशी
मच्छिंद्र आपटे
भिमराव कुबल
जोतिबा दिक्षित
पंढरीनाथ मराठे
शिवाजी देशपांडे
संभाजी पुराणिक
मारूती सहस्रबुद्धे
तुकाराम कुलकर्णी
बहुजनांची काही आडनावे ब्राम्हणांच्या आडनावा सारखी असतात उदा. जोशी हे आडनाव आग्री व
कोकणात गाबित समाजाची असतात याची नोंद घ्यावी. मात्र ब्राम्हणांची नावे ही फक्त त्यांच्या पुराण पुरूषांच्या
नावावरूनच ठेवलेली असतात.
जसे,
राम = रामनाथ, रामकृष्ण, राघव
विष्णू = विष्णूपंत, विष्णूकांत.
गणपती = विनायक, गणेश, गजानन
कृष्ण = कृष्णाजी , गोपाळ, कृष्णकांत, माधव, रामकृष्ण, केशव, श्रिकृष्ण
याचा पुरावा खालील नावे पहा
केशव हेगडेवार
राम गणेश गडकरी
गोपाळकृष्ण गोखले
कृष्णाजी खाडिलकर
विष्णूपंत चिपळूणकर
कृष्णाजी केशव दामले
गोपाळ गणेश आगरकर
केशव गंगाधरपंत टिळक
विनायक दामोदर सावरकर
आता नावात काय आहे जर विचार केला कि असं लक्षात येईल कि नावात फक्त ब्राह्मणवाद
आहे.त्यामुळे आता तुम्ही विचार करू शकत आणि काय करू शकता याचा विचार करा .सर्वप्रथम ब्राह्मण किंवा
भटजींकडे जाणे / येणे टाळणे.आणि हेच ब्राह्मणवाद नष्ट करण्यासाठी पहिल पाऊल असेल .कारण आपल्या
मुलांचं भवितव्य घडविण्याच काम आपल्या हातात आहे ना कुठल्या भटजींकडे .