जिजामाता जयंती ( १२ जानेवारी ) जिजामाता जयंती ( १२ जानेवारी ) - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, January 9, 2017

जिजामाता जयंती ( १२ जानेवारी )

<img src="jijau-jayanti-utsav.jpeg"=jijamata janm-utsav">

राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म दि. १२ जानेवारी १५९८ रोजी       (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सकाळी दहा

वाजता सिंदखेड- राजा जि. बुलढाणा येथे झाला.

त्यांच्या आईचे नाव म्हसाळराणी तर वडिलांचे नाव लाखुजीराजे जाधवराव होते.

मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव व्यक्ति जर कोण असतिल तर ते म्हणजे

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजि राजे होय.

शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणाऱ्या राष्ट्रमाता जिजामाता होय .

अफझलखानाच्या भेटेप्रसंगी  त्यांनी शिवाजींना म्हणाल्या " जर तुम्ही कमी पडलात तर भीती बाळगू नका.कारण

तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनावून स्वराज्याची निर्मिती करीन" असा  हा दृढनिर्धार मेंदूत

सततजागृत ठेवणारी जिजाऊ!

म्हणून आजही म्हणावेसे वाटते ,

 जिजाऊ तुम्ही नसता तर,


नसते झाले शिवराय नी शंभू छावा…


जिजाऊ तुम्ही नसता तर,


नसता मिळाला स्वराज्य ठेवा…


जिजाऊ तुम्ही नसता तर,


नसते लढले मावळे…


जिजाऊ तुम्ही नसता तर,


नसते दिसले विजयाचे सोहळे…


 आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना आणि निर्धार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी

छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या

राजमाता यांना कोटी प्रणाम !

राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पिका जिजाऊ-आईसाहेब यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !

जय जिजाऊ! जय शिवराय! जय भीम!