डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, December 31, 2016

डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार


<img src="shilpakar.jpg" alt="father of indian constitution dr b r ambedkar"/>

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नव्हेत असा जावई शोध लावणाऱ्या शुद्रबुद्धी लोकांना पुढील

बाबी माहित असाव्यात...

संविधान निर्मितीकरिता एकूण २२  समित्या निर्माण केल्या गेल्या, ह्या बावीस समित्या "कार्यपद्धती विषयक

व्यवहार समित्या" आणि "विशिष्ट व्यवाहाराबाबत समित्या" अश्या दोन प्रमुख मुख्य समित्यांच्यात विभागल्या 

गेल्या होत्या.

प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह

समिती, ऑर्डर ऑफ बिजनेस समिती, अधिकार पत्र समिती, राज्यांसोबत वाटाघाटी करणारी समिती,

राष्ट्रध्वजावारील तदर्थं समिती इ. मात्र अश्या समितीचा घटना निर्मितीशी तितकासा थेट संबंध नव्हता.

घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय. नव्या राज्य  घटनेचा

मसुदा तयार करण्याचे सर्वात महत्वाचे काम  या मसुदा समितीकडे होते. या समिती मध्ये एकूण ७ सदस्य होते ते 

पुढीलप्रमाणे...

१) डॉ. बी. आर. आंबेडकर (अध्यक्ष, मसुदा समिती)

२) एन. गोपालस्वामी अयंगार

३) अल्लादी कृष्णमस्वामी अय्यर

४) डॉ. के. एम. मुन्शी

५) सईद महम्मद सदुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णमचारी

         "मसुदा समिती" या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . मसुदा

समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते. मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते

, त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात

सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्यावर  पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटना एकट्या 

बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करून अकलेचे तारे तोडतात.  असा बुद्धिभेद करणे हे अतिशय

संतापजनक आहे.

सदर विषयी  महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ

मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या

लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही. शासकीय ग्रंथात प्रतिपादित संदर्भ पुढीलप्रमाणे...

"...भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन,

बाबासाहेब हे भारतीय घटनेचे शिल्पकार नव्हतेच !" असे सांगून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही

मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे ,

घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तत्कालीन मान्यवरांची आहेत ....

*पुरावा क्र. १*


मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात,

*" सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा

दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक

अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चवथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. 

त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती

बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ.

आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."*

*पुरावा क्र. २*


घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,

*"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या

प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर 

भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."*

*पुरावा क्र. ३*


घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी

निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न

बाळगता ते काम तडीस नेले आहे."

डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा...

घटनेच्या विविध कलमांची तपशीलवार चर्चेच्या वेळेस सभासदांकडून विचारल्या जाणाऱ्या शंकांना उत्तरे देणे,

त्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या नाकारताना त्यासाठी स्पष्टीकरण देणे आणि मसुद्यातील मजकुराची सूक्ष्म तपासणी

करणे तो बिनचूक करण्याचे अत्यंत जटील आणि अवघड कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्ट घेऊन

आणि आपल्या तब्यतीची तमा न बाळगता कसोशीने पूर्णत्वास नेले. म्हणून त्यांना मिळालेल्या *" भारतीय घटनेचे

शिल्पकार "* म्हणणे म्हणजे त्या उपाधीचा बहुमान करणारे आहे.

जयभीम! नमो बुद्धाय! जय भारत!