विहार हे ठिकाण बौद्धांच्याप्रती अतिशय पवित्र आणि संवेदनशील क्षेत्र आहे. ते जाणून घेण्यासाठी इतिहास
जिवंत करून वर्तमानात उतरावे लागेल आणि त्याच दृष्टीकोनातून भविष्याकडे पहावे लागेल.
डॉ.बाबासाहेबांप्रती विश्वास, बुद्धांच्याप्रती श्रद्धा, धम्माच्याप्रती आवड असायला हवी. तरच सवड निर्माण होते.
दैनिक वृत्तरत्न सम्राटमधूनसातत्याने पाठपुरावा केला जातो की, दर रविवारी बौद्ध उपासकांनी शुभ्र कपडे
परिधान करून सहपरिवार विहारात गेले पाहिजे. कारण विहारात गेल्याने मनाची मलिनता कमी होऊन सुख,
शांती मिळते. मुलांना डॉ.बाबासाहेब व तथागत बुद्धांच्याप्रती आवड निर्माण होते. मुलांची मने सुसंस्कारित
होतात. ती काळाची आणि राष्ट्राचीही गरज आहे.
निव्वळ जयभीम म्हणून किंवा पुतळे उभारून त्यांच्या फोटोला हार घालून, फोटोपुढे हात जोडून, त्याने काहीच
साध्य होणार नाही. ती एक रूढी, परंपरा आहे. ते एक अद्न्यान आहे. तथागत बुद्धांना आणि डॉ.बाबासाहेब
आंबेडकरांना प्रत्येक माध्यमातून अभ्यासाने, विचाराने समजून घेणे, जाणून घेतल्यानेच त्यांची संपूर्ण जाणीव
होईल.
आमच्या माणसाकडे विहारात जाण्यास वेळ नाही. समजा वेळ मिळाला आणि विहारात गेलाच, तर धम्मद्न्यान
ऐकायला मिळेलच, असे नाही. कारण नेहमी धम्मावर प्रवचने होत नाहीत. धम्माविषयी किंवा
डॉ.बाबासाहेबांविषयी चर्चासत्रही नसतात. समजा, प्रवचनेही असतील, तर ते तेवढे प्रभावशाली परिवर्तनीय
असतीलच असे नाही. समजा ती प्रवचने परिवर्तनीय असतीलही, पण तनमनाने ऐकली जाऊ शकतील,
यावर शंकाच आहे. समजा तशा प्रकारे ऐकलेही तरी त्यावर विचार, चिंतन, मनन होईलच असे नाही. त्यावर
विचार झालाच, तर आचरण शीलतेचा प्रश्न निर्माण होतो. समजा, धम्मतत्वद्न्यानात आचरणात आणला, तर तो
ख-या अर्थाने बौद्ध म्हणून ओळखला जाईल. सर्वस्वी सुखी होईल. तो समाजात आदर्श ठरेल. तो मानापानास व
सत्कारास पात्र ठरेल.
मग आम्हाला बौद्ध होण्यासाठी काय करावे लागते ?
बौद्ध होण्यासाठी विहारात जावे लागते का?
बौद्ध होण्यासाठी विहारांची निर्मिती करावी लागते का?
बौद्ध होण्यासाठी डॉ.बाबासाहेबांची आणि तथागत बुद्धांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करावी लागते का?
धूप, दीप व पुष्प पूजा करावी लागते का?
बौद्ध होण्यासाठी शुभ्र वस्त्रे परिधान करावी लागतात का?
त्रिशरण, पंचशील, सूत्रपठण पाठ करावे लागते का?
संस्कारविधी बौद्ध पद्धतीने केल्याने बौद्ध होता येते का?
तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण पाठण केल्याने आम्हाला बौद्ध होता येते का?
भिक्खूंना चिवरदान व अन्नदान केल्याने बौद्ध होता येते का?
बौद्ध होण्यासाठी आम्हाला काय करावे लागते?
तर बौद्ध होण्यासाठी सर्वप्रथम बुद्ध तत्वज्ञान समजून घेउन त्यनुसार आचरण
केल्याने ख-या अर्थाने आपण द्ध
होऊ शकतो. वैयक्तिक आचरणशीलतेबरोबरच २२ प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन केल्याने आपण बौद्ध होऊ
शकतो. बुद्धविहार हे बुद्धांकडे जाण्याचा मार्ग आहे.
होऊ शकतो. वैयक्तिक आचरणशीलतेबरोबरच २२ प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन केल्याने आपण बौद्ध होऊ
शकतो. बुद्धविहार हे बुद्धांकडे जाण्याचा मार्ग आहे.
तथागत बुद्धांचे वचन आहे की, एखादा भिक्खू माझ्या चिवराचा कोपरा धरून रात्रंदिवस माझ्या सुख-दुःखात
सावलीसारखा माझ्यासोबत असेल, मला हव्या नको त्या गोष्टींची काळजी घेत असेल, पण तो जर धम्माचे
आचरण करीत नसेल, आणि धम्माचा प्रचार-प्रसार करीत नसेल, तर तो भिक्खू माझा नाही आणि कोसो दूर
एखादा भिक्खू धम्माचे आचरण करीत असेल, प्रचार-प्रसार करीत असेल, तर तो भिक्खू माझा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी केलेल्या कार्यासाठी
झटा.तथागत बुद्धही म्हणतात, माझी पूजा करु नका. त्याऐवजी धम्माचे आचरण करा. धम्माचे आचरण म्हणजे
माझ्यासाठी पूजा आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांना आपण मानतो. मानणा-यांची संख्या करोडोंवर आहे. पण
जाणणा-यांची संख्या ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी ज्या रुढी, परंपरा, कर्मकांड, आत्मा, ईश्वर याविरुद् शेवटच्या क्षणापर्यत लढे दिले.
मूर्ती पूजा, व्यक्ती पूजा, दगडधोंड्यांची पूजा करणा-या धर्माचा त्यग करुन पुन्हा मूर्ती पूजेचे वेड स्विकारायचे
नाही. असा ठाम निश्चय पूर्ण सामर्थ्यानिशी केला होता. पण त्यांच्या अनुयायांनी त्याच गोष्टी त्यांच्यासमोर आणून
ठेवल्या. डॉ.बाबासाहेबांना ज्या गोष्टीची भिती होती, त्याच गोष्टी वारंवार केल्या.
डॉ.बाबासाहेबांनी ज्या गोष्टींची चेतावनी दिली होती, त्या त्या गोष्टी जाणूनबुजून केल्या. त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा
वेशीवर टांगल्या. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेला मानणार नाही किंवा त्यांची
उपासना करणार नाही. ते तर डंके की चोट पर केल्या. गणपती बसविले, गौरींचे उपवास करुन अनवाणी पायाने
राहून व्रत पूर्ण केले. आता तर सुधारित बौद्ध निर्माण झालेले दिसतात.
हिंदू धर्माचे सण साजरे करायचे पण बौद्ध पद्धतीने गणपती बसवायचा, पण तो निळा असायला हवा. दिवाळी
साजरी करायची, पण निळी लायटिंग, घराला निळा रंग, निळा आकाश कंदील, वर अशोकचक्र, रंगपंचमी
करायची, पण निळा रंगच वापरायचा. कारण आम्ही बौद्ध आहोत. आता हे खूळ कुठून आले कुणास ठाऊक. ही
एक भयानक विकृती आहे. धम्मप्रचारकांनी धम्म म्हणजे काय? याची योग्य उकल करुन न सांगितल्याने आलेले
पीक असावे. हिंदू धर्मातील अंद्धश्रद्धा असावी.
मला या ठिकाणी कोणाची मने दुखविण्याचा हेतू नाही. अशा स्थितीत जीवन जगत असताना दाही दिशांतून
अंद्धश्रद्धेचा वर्षाव सर्वत्र मंदिरांची, देवळांची गर्दी, देवळांच्या समोर भाविकांची गर्दी, सर्वत्र अंद्धश्रद्धेचे जंगल या
जंगलात कुठेतरी बोधिवृक्ष म्हणजे बुद्धांचे विहार, विहारात गेले पाहिजे. डॉ.बाबासाहेबांनी सांगितले आहे. त्यांची
अंमलबजावणी नको का व्हायला?
विहारे हे बौद्ध संस्काराची केंद्रे बनावीत, तरच समाज मने संस्कारित होतील. पण विहारात येणा-यांची संख्या
रोडावली आहे म्हणणा-यांनी स्वतः याचे आत्मपरीक्षण करावे. का रोडावली?
या प्रश्नाचे उत्तर शेकड्यानिशी मिळतील, त्या उत्तराला स्वतःपासून सुरुवात करावी. शोधले तर सापडेल आणि
त्यावर कृतीही करता येईल. समाजाचे नेतृत्व स्विकारणा-यांनी प्रथम धम्माचा सूक्ष्म अभ्यास करणे आवश्यक
आहे. सद्यस्थितीचे भान आणि इतिहासाची जाणही तेवढीच आवश्यक आहे.
समाजाला मार्गदर्शन करताना स्पष्ट आणि सकारात्मक असावे. धम्मद्न्यान उकल करुन सांगण्याची हातोटी
असावी. निर्भिडपणा असावा. निव्वळ पूजापाठ नसावा. धम्मद्न्यान जीवनात कसे पावलोपावली उपयोगी आहे,
यावर योग्य समर्पक उदाहरणे आणि वैद्न्यानिक दाखल्यांची गरज गरज आहे.
माझे ते खरे म्हणण्यापेक्षा, खरे ते माझे म्हणावे. निरर्थक पोपटपंची, व्यर्थ बडबड केल्याने श्रोत्यांच्या मनावर
प्रभाव पडणार नाहीच,पण ते ख-या धम्मद्न्यानापासून वंचित राहतील.
डॉ.बाबासाहेब म्हणतात की, आमचे धम्मप्रचारक हे धम्माचे उदाहरण देताना समुद्राच्या किना-यावर उभे राहून
समुद्रातील बोटीकडे बोट करुन म्हणतात, धम्म म्हणजे त्या समुद्रातील बोटीप्रमाणे आहे. त्या बोटीत बसून सर्व
समुद्र पार करता येतो. अगदी तसेच धम्मात येणा-या व्यक्तीला धम्मद्न्यानाने भवसागर पार करता येते. पण ते
धम्मप्रचारक मात्र त्या बोटीत पाय न ठेवताच अनुभव सांगतात. मग अनुभूती कशी येणार?
अनेक भिक्खू धम्मप्रवचनाऐवजी प्रबोधन करीत आहेत. प्रबोधनातून मनोरंजन, मनोरंजसाठी विनोद,
विनोदासाठी चेष्टा, मस्करी, हंसीमजाक असे घडले, तर बौद्ध समाजाला भवितव्य कुठे उरणार? आमचे
समाजकारण केवळ
चर्चेचा विषय आणि राजकारण चेष्टेचा विषय आणि धम्मकारणाला खिळ बसून धम्माच्या प्रचार-प्रसाराला वेगळी
दिशा मिळून धम्म ग्लानीस कारण ठरु शकते. म्हणजेच रोगापेक्षा औषध जहाल अशी काहीशी अवस्था होणार
आहे, तर मग चला विहार हे संस्कार केंद्र बनवू या.