संत कबीर : कृतीशिवाय उपदेश करणे हे मूर्खांचे लक्षण होय.तो कृतीशून्य वागत असेल तर...रात्रंदिवस केलेले उपदेश उपयोगी पडत नाही.
मुक्या प्राण्यावर दया करावी...बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही...देव आपल्या मनात राहतो...देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते.
ते सर्व परिपाठ भिक्षुकांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत...
या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते .
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सर
: यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते...तेव्हा ते खूप जवळही असू
शकते.जेंव्हा तू प्रतिकुल परिस्थतीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे
मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल,तेव्हा थोडा विसावा घे, पण
माघार घेऊ नकोस अजिबातच माघार घेऊ नकोस...येणा-या सर्व आव्हानांसाठी सज्ज
रहा, त्यांना खंबीर मनाने सामोरे जा ऐरण झालास तर घाव सोस... हातोडा झालास
तर घाव घाल.
नेताजी सुभाषचंद्र बोस : सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज :
प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त।बाकीचें झंजट फालतू । समजतों
आम्ही ॥दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर ।सर्वांसि होईल सुखकर ।
म्हणोनिया ॥लग्नासाठी कर्ज करावे । जन्म भर व्याज भरीत जावे॥पैश्या साठी
कफल्लक व्हावे । कोन्या देवे सांगितले ॥
क्रांतीसुर्य
ज्योतिराव फुले : ईश्वर एकच व निर्गुण-निराकार आहे... ईश्वराच्या
भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही... धार्मिक कर्मकांडावर
विश्र्वास ठेवू नका !!
साहित्यरत्न शाहीर अण्णा भाऊ साठे : "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती येथील दलित,कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे.''
प्रबोधनकार सत्यपाल महाराज :
शेतकरी माय-बाप हो..जगाचा पोशिंदा म्हणून तुमची ओळख आहे..एका दाण्याचे
शंभर दाणे करण्याची किमया तुमच्यातच आहे म्हणून म्हणतो जरा धीराने
घ्या... एकाचे शंभर आणि शंभराचे कोटी होतील...असे करता करता सर्व कर्ज
निकाली निघेल...आत्महत्या हा कोणत्याही संकटावरील पर्याय होऊ शकत नाही...
बाबांनो जे बाजारात विकते , तेच पिकवा..
स्वामी विवेकानंद : जब पड़ोसी भूखा हो तब मंदिर में भोग चढ़ाना पुण्य नहीं पाप है !
सत्यशोधक विचारवंत आण्णा भाऊ साठे : हे दिन दुबळ्यांचे हात कष्ट मेहनत करून तेस्वतः जगतात व इतरांना जगवतात. गरिबांच्या कष्टावरच सर्व व्यवहार चालत असतात. त्यांच्या मेहनतीला नेहमी फळ येते.ती जगतात आणि जगवतात !!
पु.लं.देशपांडे('एक
शुन्य मी' या पुस्तकातुन) : एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही
रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू
लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला
नाही.पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म
या कल्पना धूर्त सत्ताधा-यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत,याविषयी मला
यत्किंचितही शंका नाही.
डॉ. श्रीराम लागू.
: कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात,आणि कुठल्याही श्रद्धा डोळस
नसतात,डोळस श्रद्धा हा वदतोव्याघात आहे. प्रेम जसे आंधळे असते.तशी श्रद्धा
ही आंधळीच असते. मी परमेश्वरावर श्रद्धा आहे असे म्हणण्याने ती श्रद्धा
डोळस होत नाही.ज्या वस्तूच्या (किंवा संकल्पनेच्या) अस्तित्वाचा कसलाही
पुरावा, काही हजार वर्षांच्या शोधानंतरही उपलब्ध झालेला नाही त्या
वस्तूवरची किंवा संकल्पनेवरची म्हजे परमेश्वरावरची श्रद्धा डोळस कशी ?
आपल्यावर पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारांचा परिणाम म्हणून ती श्रद्धा फार
तर प्रामाणिक म्हणता येईल पण डोळस नव्हेच. भूतपिशाच्च ह्या संकल्पनाच
आहेत. त्याही परमेश्वर ह्या संकल्पनेइतक्याच जुन्या आहेत त्यांच्याही
अस्तित्वाचा कसलाच पुरावा नाही. मग त्या तेवढ्या अंधश्रद्धा,आणि
परमेश्वरावरची श्रद्धा मात्र डोळस श्रद्धा, हे कसे काय ?
डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर
: अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी,कालविसंगत
कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल,फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा,
सात्त्विक भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार धूळफेक वा चलाख
लूटमार केली जाते. त्याला ना जात,ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले,
आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.
सिंधुताई सपकाळ : रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल.
डॉ.आ.ह.साळुंखे.
: परिवर्तनाची प्रक्रिया हि एक सुंदर तपश्चर्या आहे.असे मला वाटते. आपणही
तपश्चर्या निष्ठेने, विवेकाने,संयमाने, परस्पर विश्वासाने, परस्पर सहायाने
करू.या परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीने आधी चांगला माणूस कसे
बनायचे ते शिकले पाहिजे आणि तसे बनले पाहिजे, असे मी मानतो. जे हि
प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्या पुढे मी नतमस्तक
आहे.