अंधश्रढेची कारणे अंधश्रढेची कारणे - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, December 27, 2016

अंधश्रढेची कारणे

माणूस अंधश्रद्ध का बनतो... तर त्याची सुरुवात लहाणपणीच झालेली असते .लहानपणी आई म्हणते "राजा

तिकडे नको जाउस 'भू' येईल...

लहानपणी आई म्हणते देवबाप्पासमोर हात जोडून बोल "मला पास कर देवबाप्पा"...टीवीवर कार्टून मधे

चमत्कार, जादू सारख्या अवैज्ञानिक गोष्टी दाखवून लहान मुलांचे मनोरंजन परंतु या चमत्कार व जादुंचे

अंतर्मनात खोलवर संस्कार रुजुन मोठे झाल्यावरही त्या व्यक्तीच्या मनात चमत्कार व जादू बद्दल आकर्षण

कायम राहणे.

शाळेत जे विज्ञान शिकविले जाते त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध न जोडणे.

<img src="andha-shraddha.jpeg"alt=andha-shraddha">


Law Of Monopoly म्हणजेच जर समाजात 99% लोक जर याच मार्गाने चालत असतील तर ते नक्कीच योग्य

असावेत आपणही त्यांचेच अनुकरण करावे हा समज.मानवी जीवन हे भावभावनेचे आणी गुंतागुंतीचे

असल्याकारणी त्यात असीम सुखदुखःची आश्चर्यकारक शॉकिंग सरमिसळ आहे ज्या गोष्टी त्याला धक्का देऊन

जातात व त्याचा चमत्कारांवर विश्वास बसु लागतो.

आपण हे केले म्हणून हे झाले आणी आपण ते केले म्हणून ते झाले अशा काही योगायोग घटनांना माणुस

नियम मानून त्याचे ओझे जीवनभर वाहतो

Law Of Repeated Audio Visual Effect - या तत्वा आधारे समाजात मिडिया, माउथ पब्लिसिटी, सामाजिक

उत्सव, इत्यादी माध्यमातून जे माणसाला पुनःपुन्हा दाखवले जाते ऐकवले जाते त्यावर मन सहज विश्वास

ठेवते. 'भय' आणी 'लोभ' या दोन नैसर्गिक भावना या प्रत्येका मानवामधे मोठ्या प्रमाणात असतात. पण ज्या

दिवशी या भावना माणसाच्या जीवनावर प्रभुत्व मिळवतात तेव्हा तो मानसिक गुलामगिरित फसु लागतो

शेवटचे आणि सर्वात महत्वाचे 'चमत्कार' असतो हे शेकडो वेळा ठासुन सांगणारे सर्वच धर्मांचे ग्रंथ या गोष्टीला

कारणीभुत आहेत.

No comments:

Post a Comment