कथा तीन वेड्यांची...तीन हसणारे भिक्षु.... कथा तीन वेड्यांची...तीन हसणारे भिक्षु.... - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, July 5, 2021

कथा तीन वेड्यांची...तीन हसणारे भिक्षु....






आज आपण नवीन विषयावर बोलणार आहोत विषय तसा जुनाच आहे पण भरपूर लोकांना या बद्दल माहिती नाही 

तीन हसणारे भिक्षु,

होय तीन हसणारे भिक्षु आत्ता हा काय नवीन प्रकार हेच वाटतंय ना तुम्हाला तेच सांगतोय...

तर कथा अशी...

चीन देशात तीन भिक्षु राहायला होते तिन्ही भिक्षूंची नावे अद्याप माहिती नाही.
 

नेहमीच सारखे हसत राहणारे हे भिक्षु प्रत्येक गावोगावी जाऊन गावातील गर्दीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेत उभे 

राहून मनसोक्त हसत असत त्यांच्या हसण्याला बघून आजूबाजूची लोक त्यांना वेडी समजायची त्या साऱ्या 

लोकांच्या शारीरिक व्यवहाराकडे दुर्लक्ष करीत हे भिक्षु गण आपल्या हसण्यात मग्न असत त्यांच्या या कृत्याने काही 

वेळात आपोआप आजूबाजूला जमलेली लोक हसायला लागायची ती लोक हसायला लागली की या तिन्ही भिक्षूंचे 

कार्य संपून जायचे ते लोकांना त्यांच्या जिवंत पणाची जाणीव करून त्यांच्या अस्तित्वाशी ओळख करून द्यायचे...

तिन्ही भिक्षु पुन्हा नवीन गावाच्या दिशेने निघून जायची

"त्यांचा हा एकमेव उपदेश होता त्यांचा एकच संदेश होता आणि तो म्हणजेच हास्य."




मानव जातीला त्याच्या अस्तित्वाची व जिवंत पणाची जाणीव हे हास्य करून देत म्हणून ते असं करीत असतील हे 

माझं मत आहे.

त्यांच्या अश्या वागण्याची वार्ता संपूर्ण देशात पसरली संपूर्ण गावे त्यांना ओळखायला लागलेली...

परंतु लोकांना एक खंत होती ती म्हणजे ही भिक्षु गण नेहमीच हसत असतं यांना रडतांना व दुःखी होतांना कुणीही 

बघितलेलं नाही या तिन्ही पैकी कोणी एखादी मृत पावले तर हे तेव्हा तरी रडतील काय?

निसर्गाच्या नियमानुसार ती वेळ ही आली
  

एका गावी ही तिन्ही भिक्षु वास्तव्यास असतांना यांच्यातील एका भिक्षुचें परिनिर्वाण झाले.

त्या गावातील संपूर्ण लोक जमलीत व या दोन भिक्षु कडे आश्चर्याने बघू लागलीत त्यांच्या एका साथीदाराचे परिनिर्वाण 

झालेले असतांना देखील हे भिक्षु मनसोक्त हसत होती त्याना कुठल्याही प्रकारचे दुःख झालेले नव्हते त्यांना असे 

हसतांना बघून काही लोकांनी त्यांना विचारले तुमच्यातील एक भिक्षु मृत झालाय त्याच तुम्हाला किंचित ही दुःख 

नाही त्यावर ती दोन्ही भिक्षु म्हणालेत दुःख कशाचं जी व्यक्ती मृत पावलीये अर्थात ती मेलेली नाहीच ती जिंकलीये 

आणि जिंकलेल्या व्यक्तीच्या यशात दुःख व्यक्त करायचा नसतो आनंद व्यक्त करत त्याच्या विजयात मिसळावं 

लागतं..

सर्व गावकरी त्यांना विचित्र नजरेने बघू लागलेत विजय, जिंकणे या सारख्या शब्दांनी ते गोंधळून गेलेले होते...

पुन्हा त्यातील एक भिक्षु म्हणाला

आम्ही तिन्ही एकमेकांना नेहमीच म्हणायचो आपल्यात सर्वात अगोदर कोण मरेल..

या आमच्या मारण्याच्या शर्यतीत सुद्धा हा विजयी झाला व आम्हाला हरवून गेला...

आम्ही अनेक वर्ष सोबत राहिलो...

आम्ही आमच्या एकतेचा व एकमेकांच्या उपस्थितीचा आनंद लुटला...

जेव्हा तो आम्हाला सोडून जातोय तेव्हा दुःख व्यक्त करण्यात काय अर्थ आहे जाता जाता ही त्याला आनंदात 

पाठवूयात याच उद्देशाने आम्ही मनसोक्त हसतोय...

ती तिन्ही भिक्षु जरी आनंदी असले तरी सर्व गाव मात्र खूप दुःखी होत

मृत पावलेल्या भिक्षुच्या पार्थिवाला जेव्हा वैकुंठात चितेवर ठेवल्या गेलं तेव्हा लोकांना कळून चुकलं ही दोन्ही भिक्षुच 

आनंदी नसून हा तिसरा मृत भिक्षु ही आनंदी आहे त्याच्या चेहऱ्यावर ते मुक्त हसू स्पष्टपणे जाणवत होत..

मरण्याच्या काही वेळ अगोदर त्या एका भिक्षूने त्या दोन्ही भिक्षूंना सांगितले होते मी मेल्यानंतर माझे परिधान केलेले 

वस्त्र बदलवू नये आणि ते पारंपरिक सुद्धा होत...

परंतु एखादी व्यक्ती मृत झाल्यावर त्याचे वस्त्र बदलावे लागतात व त्याला अंघोळ घालावी लागते...

अंघोळ घालण्यामागे कारण फक्त एवढेच आहे की संपूर्ण जीवनात आपल्या हातून झालेल पाप संपूर्ण पणे धुवून 

निघावं व शरीर शुद्ध व्हावं.[ हे वाक्य परंपरे नुसार आहे नोंद असावी ]

तिसऱ्या भिक्षूने सांगितले होते मी मेल्यानंतर मला अंघोळ घालू नये कारण मी कधीही अशुद्ध नव्हतो माझ्या 

जीवनात एवढ मुक्त हसू होत की त्याने माझ्यात अशुद्धतेला किंचितही जमा होऊ दिलं नाही,

नाही माझ्या वस्त्रात मी कधी धूळ जमा होऊ दिली.

म्हणून नाही माझी अंघोळ घालायची नाही माझे वस्त्र बदलायचे...




त्यांच्या या इच्छेला सन्मान देत त्यांच्या परिनिर्वाणा नंतर नाही त्यांना अंघोळ घातली नाही त्यांचे वस्त्र बदलले...

जेव्हा त्या भिक्षुला अग्निडाव देण्यात आला तेव्हा अचानक त्या भिक्षूंच्या वस्त्राखाली काही आनंद देणाऱ्या चिनी 

आतिशबाजी [ फटाके ] लपवून ठेवलेली होती संपूर्ण आतिशबाजी झाल्यांनतर सर्व गावकरी मुक्तपणे हसून 

उठले...

त्या मृत भिक्षूचे दोन सहकारी चितेकडे बघून म्हणू लागले

तू धूर्त आहेस, तू मेलेला आहेस तरी तू पुन्हा आम्हाला मात देऊन गेलास हरवून गेलास...

आत्ता तुझं हे शेवटचं हसू आहे मुक्तपणे हसून घे आमच्यावर...

त्यांच्या या अगळ्या वेगळ्या स्वभावाला समजून घेत त्या तिन्ही हसणाऱ्या भिक्षूंना चीनने नेहमीच खूप प्रेम दिलंय ते 

आजतोपावेत.

[ टीप - "एखाद अलौकिक हसू तेव्हा उत्पन्न होत जेव्हा या विश्वातील संपूर्ण विनोद आपण समजून घेतो आणि असं 

हसू फक्त आणि फक्त बुद्ध हसू शकतात"

हे तिन्ही भिक्षु बुध्दच असावेत ]

- लेखक - दिनेश आशा जगन्नाथ मोरे [जामनेर] 7776031070

No comments:

Post a Comment