तथागत भगवान गौतम बुध्दांच्या जीवनात वैशाख पौर्णिमे इतकी वैशिष्टयपूर्ण पौर्णिमा कोणतीच नाही.
तथागतांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी एकून पाच अतिमहत्वाच्या घटनांची नोंद आढळते.
1) प्रथम घटना- राजपुत्र सिध्दार्थचा जन्म
इ.स.पू. ५६३ सालची वैशाख पौर्णिमा, शाक्य संवत ६८, वार
मंगळवार. या सुदिनी सिध्दार्थ गौतमाचा जन्म झाला. कपिलवस्तू
नगरीचे जनप्रिय महाराज शुध्दोदन यांची पत्नी महामाया प्रसवकाळ
जवळ येताच माहेरी निघाली. वाटेत नेपाळ तराईच्या अरण्यामध्ये
शालवृक्षांनी सुशोभित, नानाविध फुलां-फळांनी बहरलेल्या, लुम्बिनीत सुगंधी अशा नयनरम्य वातावरणात
राणीने उगवत्या सुर्याच्या साक्षीने राजपुत्रासजन्म दिला. शुध्दोदनाच्या कुटुंबात अनेक वर्षापासून बालक
जन्मले नव्हते. या बाळाच्या जन्माने सर्व अर्थ सिध्द झाले म्हणून बालकाचे नामकरण सिध्दार्थ असे
करण्यात आले.
2)दुसरी घटना- युवराज्ञी यशोधरेचा जन्म
इकडे ज्या क्षणी लुम्बिनीत राजपुत्र सिध्दार्थ जन्मला त्याच वेळी रामनगर नावाच्या राज्यात कोलीय राजा
दण्डपाणि यांच्या राजवाड्यात यशोधरा या सुंदर बालिकेचा जन्म झाला. याचाच अर्थ राजकुमार सिध्दार्थ
आणि राजकन्या याशोधरा हे दोघे समवयस्क होते.
3)तीसरी घटना- राजकुमार सिध्दार्थचा विवाह
दण्डपाणि राजाने आपली कन्या यशोधरा १६ वर्षाची झाल्यावर तेव्हाच्या प्रचलित नियमानुसार स्वयंवराचे
आयोजन केले. दण्डपाणिराजाने देशोदेशीच्या राजपुत्रांस आमंत्रण दिले तसे सिध्दार्थासही दिले.प्रथम सिध्दार्थ
स्वयंमवरास जाण्यास तयार नव्हता. सिध्दार्थाची मावशीमहाप्रजापती गौतमी हीने त्यास यशेधराच
आपल्याला सुन म्हणून हवीअसा आग्रह धरला. स्वयंमवरात सिध्दार्थाने जे इतराना जमले नाही ते करून
दाखवले. अटीप्रमाणे एका हट्टी, वन्य, नाठाळ घोड्यावर स्वार होऊन त्यास सुतासारखे सरळ केले.
'अश्वलक्ष्यविद् या' सिध्दार्थास येत होती. त्याचबरोबर सिध्दार्थाने 'लिपीज्ञान', 'संख्याज्ञान', 'धनुर्विद्या',
'काव्य', 'व्याकरण', 'पुराण', 'इतिहास', 'वेद', 'ज्योतिष', 'सांख्य', 'वैशेषिक', 'स्त्रीलक्षण',इ. कला व विद्येतील
प्रवीणता सर्वसाक्षीने सिध्द केली. राजकन्या यशोधरेने राजपुत्र सिध्दार्थाच्या गळ्यात वरमाला घातली आणि
त्यांचा विवाह संपन्न झाला.तो दिवस होता वैशाख पौर्णिमा इ.स.पू. ५४७.
4) चौथी घटना- ज्ञान प्राप्ती
ही घटना सर्व मानव जातीसाठी नवा प्रकाश घेऊन येणारी ठरली. सर्व मानव जातीस, पशू-पक्षांस,
सुक्ष्मजीवास, सजीव-निर्जीवास कल्याणकारी मार्ग दाखवणाऱ्या अरहंत, सम्मासम संबुध्द यांच्या
ज्ञानप्राप्तीस अनन्य साधारण महत्व आहे. तो दिवस होता बुधवार, वैशाख पौर्णिमा इ.स.पू. ५२८. सिध्दार्थ
सम्यक संबुध्द झाला तेव्हा त्यांचे वय केवळ ३५ वर्षे होते.
यास्मिं निसज्ज वजिरासन बन्धनेन,
जेत्वासवासन किलेसबलं मुनिन्दो !
सम्बोधि ज्ञानमनगम्य पिहासि सम्मा,
तं बोधि चेतियमहं सिरसा नमामि !!
जेत्वासवासन किलेसबलं मुनिन्दो !
सम्बोधि ज्ञानमनगम्य पिहासि सम्मा,
तं बोधि चेतियमहं सिरसा नमामि !!
अर्थः-ज्या वज्रासनावर बसून आणि दृढतापूर्वक आरूढ होऊन भगवान सम्यक सम्बुध्दांनी मार सेनेच्या सर्व
आक्रमणांना विफल करून सम्यक सम्बोधी तत्वाचा साक्षात्कार केला त्या परम पवित्र बोधिचैत्यास मी
नतमस्तक होऊन वंदन करतो.
5) पाचवी घटना- महापरिनिर्वाण
वयाच्या ८० व्या वर्षी इ.स.पू.४८३ वैशाख पौर्णिमेला रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी कुशीनगर याठिकाणी शालवनात
एका वृक्षाखाली भगवंत महापरिनिर्वाणपद प्राप्त झाले.
भगवंत महापरिनिर्वाणास जाण्याआधीचे अंतिम शब्द होते,
अनिच्चा वत संखारा, उप्पादवय धम्मिनो
उपजित्वा निरूज्झान्ति तेसं वूपसमो सुखो
अर्थः- "भिक्खुंनो! सर्व संस्कार नाशवंत आहेत, तुम्ही अप्रमादी राहून आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करा."
समस्त मानव जातीस शांतीचा संदेश देणार्या तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना मैञीपुर्ण सदिच्छा !!
जय भिम ! नमो बुद्धाय !!