बीड न्यायालयाचा एैतिहासीक निकाल बीड न्यायालयाचा एैतिहासीक निकाल - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Wednesday, May 3, 2017

बीड न्यायालयाचा एैतिहासीक निकाल

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात बीड न्यायालयाचा एैतिहासीक निकाल : 
घर जाळल्या प्रकरणी चार जणांना जन्मठेप

बीड (प्रतिनिधी) : शिरुर तालुक्यातील निमगाव येथील अनुसूचित जातीतील तिघा जणांना मतदान का केले 

नाही, असे म्हणत मारहाण करीत त्यांचे घर जाळल्या प्रकरणी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा बीडच्या 

न्यायालयाने सुनावली आहे. अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात एवढी मोठी शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. 

बाबासाहेब देवकर, सोमनाथ देवकर, ज्ञानेश्वर देवकर आणि अशोक देवकर (सर्व राहणार निमगाव ता शिरुर) 

असे जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत.

<img src="बीड-न्यायालयाचा-एैतिहासीक-निकाल.jpeg"=बीड न्यायालयाचा एैतिहासीक निकाल-BEED COURT">


शिरुर तालुक्यातील निमगाव (माहिंबा) येथील अशोक महादेव कातखडे हे २०१२ च्या जिल्हा परिषदेच्या

निवडणुकीत एका पक्षाकडून पोल एजन्ट म्हणून काम करीत होते. १८ फेब्रुवारी २०१२ रोजी मतदान झाल्यानंतर

आरोपी बाबासाहेब किसन देवकर (वय ४०), सोमनाथ जनन्नाथ देवकर (२८), ज्ञानेश्वर बबन देवकर (२९) आणि

अशोक अभिमान देवकर (२५) या चार जणांनी अशोक कातखडे यांच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ

करीत दगडफेक केली. तु राष्ट्वादीला मतदान का केले नाही असे म्हणत अशोक कातखडे, भाऊ नितीन

कातखडे, आई मालनबाई महादेवक कातखडे या तिघांना मारहाण केली. एवढेच नाही तर त्यांच्या घराला आग

लावून घर जाळले. या प्रकरणी अशोक कातखडे यांनी सायंकाळी चकलंबा पोलीस

ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली. १९ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक अवदुंबर खेडकर यांनी

चार आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१) (१०) आणि ४३६ नुसार गुन्हा

दाखल केली. परंतु यामध्ये त्यांनी अ‍ॅट्रॉसिटीची अनेक कलम गाळली. आरोपींना वाचविण्यासाठी पोलीस

अधिकाऱ्यांनी अनेक कलम गाळल्याने अशोक कातखडे यांनी गेवराई न्यायालयात कलम ४ नुसार लोकसेवका

विरुद्ध कर्तव्यात कसूर केल्याची याचिका दाखल केली. न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्यांना फटकारत इतर

कलम जोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार अ‍ॅट्रॉसिटीची अनेक कलमे जोडण्यात आली.

अशोक कातखडे यांनी शासनाच्या न्याय व विधी विभागात अर्ज दाखल करीत या प्रकरणात विशेष सरकारी

वकीलाची मागणी केली. कातखडे यांची मागणी मान्य करीत शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून औरंगाबाद

खंडपीठातील ॲड. संघमित्रा वडमारे यांची नियुक्ती केली. हे प्रकरण बीडच्या न्यायालयात पाच वर्षे चालले.

यामध्ये शासनाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरीत विशेष

न्यायालयाचे न्यायाधिक संजीव वर्मा यांनी आरोपी बाबासाहेब किसन देवकर (वय ४०), सोमनाथ जनन्नाथ देवकर

(२८), ज्ञानेश्वर बबन देवकर (२९) आणि अशोक अभिमान देवकर (२५) या चार जणांना दोषी धरत जन्मठेपेची

शिक्षा सुनावली आहे. आतापर्यंत बलात्कार, खून या प्रकरणातच जन्मठेपेची शिक्षा झाली होती. परंतु

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात चार जणांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

या प्रकरणात अशोक कातखडे यांना युवराज सोनवणे, Adv. सिद्धार्थ शिंदे, Adv. अविनाश गंडले, Adv. अभय

मगरे, सामाजिक कार्यकत्र्या मनिषा ताकले, अशोक तांगडे, तत्वशील कांबळे यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले

तसेच लढण्याचे बळ दिले. अ‍ॅट्रॉसिटीच्या अनेक प्रकरणात फिर्यादीला गुन्हा मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने

दबाव टाकला जातो. त्यामुळे अनेक प्रकरणात फिर्यादी माघात घेतात. परंतु या प्रकरणात दबाव येऊनही

अशोक कातखडे शेवटपर्यंत ठाम राहिल्याने आरोपींना शिक्षा झाली आहे.

संदर्भ : दैनिक सम्राट ( पहिल्या पानावरील लेख आहे )