बौद्ध धम्म महान कसा ? काय वेगळेपण आहे बौद्ध धम्मात ? ...हे अन्य धर्मियांना कसं पटवून सांगणार बौद्ध धम्म महान कसा ? काय वेगळेपण आहे बौद्ध धम्मात ? ...हे अन्य धर्मियांना कसं पटवून सांगणार - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, December 26, 2016

बौद्ध धम्म महान कसा ? काय वेगळेपण आहे बौद्ध धम्मात ? ...हे अन्य धर्मियांना कसं पटवून सांगणार

<img src="buddha-dhamm.jpeg" alt=how buddha dhamma teaches us">



बौद्ध धम्म सर्वोत्तम " आहे यात तिळमात्र शंका नाही.आज प्रत्येक बौद्ध बांधव मोठ्या अभिमानाने सांगतो की

आमचा बौद्ध धर्म सर्वोत्तम आहे, पण एखाद्यानी जर विचारलेच की तुमचा बौद्ध धर्म सर्वोत्तम कसा काय,ते जरा

सांगा......

तेंव्हा मात्र आपल्याला ते सिद्ध करताना नुसती धांदल उडते. कारण बौद्ध धर्माची व्याप्ती व आवाका एवढा प्रचंड

आहे, की ते काही शब्दात मांडता येण्यासारखे नाही. पण अगदीच थोड्या शब्दात सांगायचे झाल्यास ते असे 

सांगता येईल.स्वातंत्र्य, समता व बंधूता हे तीन बौद्ध धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. बुद्धाने स्पष्ट सांगितले आहे 

की,तुमच्या बुद्धिला पटल्यास धम्म स्विकारावे मी सांगतो म्हणून नाही.बुद्धाची शिकवण ओळखण्याच्या काही 

कसोट्या सांगितल्या आहेत.त्यातील मुख्य कसोटी

" तर्क व बुद्धिवाद होय "

" बौद्ध धर्म जगातील पहिला व एकमेव धर्म आहे जो मनाच्या अवस्थांवर चिकीत्सक काम करतो

ईतर सर्व धर्मात दु:खाचे निवारण करण्यासाठी ईश्वराच्या चरणी लोटांगन घालण्याचे उपाय

सुचविले आहेत,जसे की ख्रिस्चन धर्मात दु:ख मूक्तीसाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे,त्या प्रार्थने मूळे ईश्वर

प्रसन्न होऊन आपल्याला दु:खातून मुक्त करतो,इस्लाम मधे अल्लाची प्रार्थना केली जाते,एखाद्यावर दु:खाचे

डोंगर कोसळल्यास अल्ला नाराज असल्याचे म्ह्टले जाते,किंवा एखाद्याच्या वाट्याला सुख आल्यास अल्ला

मेहरबान असल्याचे म्ह्टले जाते,म्हणजे सुख व दु:खाचा संबंध थेट देवाशी जोडल्या जातो,त्यांच्या मते दु:ख

निवारणाची जबाबदारी सर्वस्वी देवाची आहे

" अगदी याच धर्तीवर पण थोडसं वेगळं हिंदू (वेदीक) धर्मात ही आहे.

दु:ख मूक्तीसाठी देवाची प्राथना करुन हिंदू थांबत नाही,तो होम हवन, यज्ञ व बळी देणे ईथवर मजल मारतो,

कारण हे सर्व केल्याने दु:खातून सुटका मिळते अशी भाबळी समजूत आहे,एकंदरीत वरील तीन्ही धर्म दु:खाचे

कारणजाणन्यात स्वारस्य दाखवत नाहीत तर ते ईश्वराला पुढे करुन हात वर करतात,त्यामूळे दु:ख

निवारणाचे काम बाजूला पडते "

वरील धर्मातील प्रथा चूक की बरोबर यावर चर्चा करायची नाही,फक्त कुठल्या धर्मात काय प्रथा आहेत एवढेच

अधोरेखीत करायचे होते,पण वरील सर्व धर्मा मध्ये दु:खाचे कारण ईश्वर आहे व त्याला प्रसन्न केल्याने दु:ख

निवारण होते.असा समज आहे,या ईश्वराच्या अस्तीत्वा मूळे दु:ख उत्पन्न करणारा महत्वाचा घटक मन मात्र

दुर्लक्षित राहिला,मनाच्या अवस्थांवर दु:ख अवलंबून असतो व त्या अवस्थांवर नियंत्रण ठेवून दु:ख मुक्ती

साधता येते. याचा कधी कुणी विचारच केला नाही "

" तो फक्त बुद्धानी केला "

" आता आपण बौद्ध धर्माकडे वळु या........

माणूस म्हणून जन्माला आल्यावर दु:खाशी गाठ आहे हे सर्वज्ञात आहे,पण दु:खावर उपाय मात्र निरनिरळ्या

धर्मात निरनिराळे आहेत,बौद्ध धर्मात मात्र सगळ्यात वेगळी पद्धत आहे.

" बौद्ध धर्म हा मुळात निरिश्वरवादी धर्म असल्यामूळे दु:ख निवारनाचे काम देवावर सोपविण्याची सवलत

नाही,किंवा भगवान बुद्धाने मी ईश्वर नाही,ईश्वराचा दूत नाही वा प्रेशीत ही नाही,मी तुमच्या सारखा एक साधा

माणूस आहे. असे सांगून ठेवल्यामूळे चमत्कारालाही स्कोप नाही,मग आपसूकच या दु:खाचे निवारण

करण्याची जबाबदारी माणसावर येऊन पडते "

" दु:ख निवारणाची बौद्ध पद्धती "

" आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास,डोळा दुखल्यास आपण आय स्पेशालिस्टकडे जातो, दाताचा आजार

झाल्यास आपण डेंटिस्टकडे जातो, हृदयाचा आजार झाल्यास हार्ट स्पेशालिस्टकडे जातो...पण..... मन आजारी

झाल्यास कुणाकडे जायचे ?

" मन दुखावल्यास काय करावे ????" तर यावर उत्तर आहे :- बौद्ध धर्माकडे जावे,तिथेमनावर योग्य उपचार

होतो,

भगवान बुद्ध हे जगातील पहिले मानसोपचार तज्ञ होते,बौद्ध धर्मातमनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचा अभ्यास केला जातो,विपश्यना द्वारे त्यावर उपचार केला जातो,

मनाला अधिक सुदृढ बनविण्याची कला विपश्यनेत शिकविली जाते,दु:खाचे मूळ मानण्यात आहे. अन

ज्याला मनावर काम करता येते तो दु:खांच्या हातात हात घालून हसत खेळत हिंडु शकतो,अन हे सगळं

विपश्यनेतून साधता येते.पण गंमत अशी आहे की मनाच्या आजारावर आपण उपचार करण्याचा विचारच

करत नाही,मनं दुखावल्यास त्याच्यावर उपचार आहे.हेच मुळात आपल्याला माहित नाही,मनाचे खच्चिकरण

झाल्यास त्याला परत उभं करता येते,मनातील द्वेष,क्लेश नाहिसे करुन प्रसन्न मनानी जगता येते,मनाला

लागलेले चटके, ज्यामूळे आपण अत्यंत दु:खी होऊन नकारात्मक बनतो ते सारे चटकेधुवून काढता येतात "

" एखाद्याचे शब्द मनात खोलवर जाऊन रुततात व आपण कायमचे त्या व्यक्ती बद्दल नकारात्मक बनतो,पण

मनावर योग्य ती प्रक्रिया करुन क्षमाशील बनता येते,मनातील असंतोष मिटविण्याची कला बुध्दानी हजारो

वर्षापुर्वी विकसीत करुन ठेवली आहे,पण आम्ही तिकडे पाठ फिरवून जगतो आहे, मनाला स्थैर्य मिळवून

देण्याची अत्यंत परिणामकारक विद्या भगवान बुद्धानी विकसीत केली आहे. मनाला निर्विकार करुन सुदृढ मन

बहाल करण्याची किमया बौद्ध धर्मात आहे "

" बौद्ध धर्मात मनावर उपचार करण्याची पद्धत फार प्राचिन आहे,माणसाच्या जिवनातील प्रत्येक घडामोडीत

मनाचा सिंहाचा वाटा असतो,मन जर विचलीत वा दु:खी असल्यास कुठलेच काम करता येत नाही किंवा हवा

तसा निकाल मिळत नाही,

अगदी याच्या उलट मन जर प्रसन्न असेल तर कामं सोपी व सहज होतात,नात्यांतील गोडवा वाढविता

येतो.लहान सहान अडचणीना तोंड देताना माणूस डगमगत नाही,एखाद्यानी टिका केल्यास योग्य मार्गाने उत्तर

देण्याची सुबुद्धी मनाचेच काम आहे,अशा या अत्यंत महत्वाच्या मनावर उपचार करण्याची पद्धत म्हणजे

विपश्यना होय अन ही विपश्यना बौद्ध धर्माची सर्वोत्तम देण आहे .

" भगवान बुद्धाने मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे विश्लेषण केले आहे,त्या त्या टप्प्यात मनावर उपचार

करण्यासाठी विपश्यना अत्यंत प्रभावीपणे काम करते,कलुषित मनाला स्वच्छ करण्याचे काम विपश्यना

करते,मनातील आकस काढून टाकण्याचे काम विपश्यनेद्वारे अत्यंत प्रभाविपणे केल्या जाते , आत्मविश्वास ,

एकाग्रता , चिंतन , स्मरण अशा विविधआघाड्यावर मनाला शक्तीशाली बनविन्याचे कामविपश्यनेतुन

साधता येते "

" एख्याद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जितका बौद्धिक बेसची डिमांड करतो तितकाच मनाच्या अवस्थेची

ही डिमांड करतो. अन मनाची अवस्था कायम सुदृढ ठेवण्याची कला बौद्ध धर्मात आहे "

" दु:ख हे दुसरं तिसरं काही नसून मनाची अवस्था होय. अन बौद्ध धर्म आम्हाला या अवस्थांवर नियंत्रण

ठेवण्याची कला शिकवतो,म्हणून बौद्ध धर्म सर्वोत्तम होय "

नमो बुद्धाय! जय भिम !